सामुहिक बलात्काराच्या घटनेने पुन्हा नाशिक हादरलं !

एका महिलेवर सामूहिक बसलात्काराची धक्का दायक घटना नाशिकच्या वणी येथे समोर आली आहे,या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न हा ऐरणीवर आला आहे.

गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रत महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढताना दिसून येत आहे, यातच आता आणखी एक धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील वणी गावात घडल्याचे समोर आले आहे.

एका महिलेवर टोळक्याने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्री उघडकीस आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वणी येथे एक महिला मेडिकल मध्ये गोळी आणण्यासाठी आली होती येथील एका पेट्रोल पंप येथे वॉशरूमला जात असतांना काही जणांच्या टोळक्याने त्या महिलेवर लगत असलेल्या झुडपात नेत सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटना स्थळी धाव घेत प्रकरणाची चौकशी करत एका दुचाकीच्या आधारावर घटनेतील आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे..

डॉ बि जी शेखर पाटील,पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र…

या संपूर्ण घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे..