शहरात बेकायदेशीर रित्या चोरी छुप्या मार्गाने चरस हा अमली पदार्थ विक्रीसाठी आणल्याच्या आरोपावरून सत्र न्यायालयाने तिघा आरोपींना दहा वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठवली आहे.०६ डिसेंबर 2012 रोजी पंचवटीतील रासबिहारी ते मेरी लिंक रोडवर हा प्रकार घडला होता .या रस्त्याने संशयास्पद येत असलेल्या तवेरा वाहनाने टोचन केलेल्या पजेरो गाडीची पंचवटी पोलिसांनी झेडपी घेतली असतात त्यात सहा किलो 900 ग्राम वजनाचा व सुमारे 13 लाख 80 हजार रुपये किमतीचा जरासा अमली पदार्थ आढळून आला होता. गाडीत आढळलेला चरस नाशिक शहरात विक्री करण्यासाठी येत असल्याची पोलिसांना खात्री पटल्यानंतर तत्कालीन गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने ही कारवाई केली होती.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी निखिल उर्फ सनी सुरेश गायकवाड ,इलियास महमूद शेख, चंद्रशेखर सुखदेव शेरेकर या तिघांना अटक केली होती. या अटक केलेल्या सर्वान विरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करण्यात येऊन सत्र न्यायालयात 2013 मध्ये दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धन देसाई यांच्यासमोर होऊन सरकार पक्षातर्फे सरकारी वकील सुधीर कोतवाल यांनी पाच साक्षीदार तपासले त्यात रासायनिक प्रयोगशाळेकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल हा चरस असल्याचा पुरावा दाखल करण्यात आल्याने न्यायालयाने तिघा आरोपींना प्रत्येकी दहा वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठवली आहे. दंड न भरल्यास आणखी एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.