१२० आदिवासी विद्यार्थ्यांना टेम्पोत कोंबले..मंत्री विजयकुमार गावित संतप्त, घेतला मोठा निर्णय

राज्यातील गोंदियामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे.  जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रम शाळा मजितपुर येथील 120 विद्यार्थ्यांना (407 टेम्पो ट्रक) टेंपोत क्रीडा स्पर्धांसाठी एका वाहनात कोंबुन नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात काही मुले प्रवासा दरम्यान बेशुद्ध झाले असून त्यांचावर उपचार सुरु आहेत. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी या प्रकरणी मुख्याध्यापकाला निलंबीत करण्याचे आदेश दिले आहेत.


धक्कादायक प्रकार

गोंदीया जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रम शाळा मजितपुर येथील आदिवासी विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांसाठी एका वाहनात कोंबुन नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यातील काही मुले प्रवासा दरम्यान बेशुद्ध देखील झाल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावितांनी नाराजी व्यक्त करत या शाळेच्या मुख्याध्यापला निलंबीत करण्याचे आदेश दिले आहे.

नागपुरच्या अप्पर आयुक्तांनी केले निलंबित

गोंदियाच्या मजितपुर गावातील शासकिय आदिवासी आश्रम शाळेतील 120 विद्यार्थ्यांना (407 टेम्पो ट्रक) टेंपोत अक्षरशह कोंबत नेले होते. मजितपुर शासकिय आश्रम शाळेतील मुख्यध्यापक व माध्यमिक शिक्षकास निलंबित केले आहे. मुख्याध्यापक शरद थुलकर व एन. ति. लिल्हारे यांना निलंबित करण्यात आले आहे. नागपुरच्या अप्पर आयुक्त, आदिवासी विकास यांनी  निलंबनाचे आदेश दिले आहेत.

आदिवासी विकास मंत्री गावित म्हणतात

विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने घेवुन जाणे चुकीचे असुन अशा प्रकार पुन्हा खपवुन घेतला जाणार नसल्याचे संकेत देत या प्रकरणी कठोर कारवाईचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावितांनी दिले आहे.