नाशिक | प्रतिनिधी
आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक या संवर्गातून सहायक पशुधन विकास अधिकारी या पदावर १३ कर्मचाऱ्यांना समुपदेशनाने पदोन्नतीने पदस्थापना दिली.
पदोन्नती दरम्यान समुपदेशनासाठी महिला व अपंग कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले. यावेळी जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी विष्णुपंत गर्जे, पशुधन विकास अधिकारी अबोली साताळकर, सहायक प्रशासन अधिकारी उत्तम चौरे, वृषाली पाठक, स्वीय सहायक गौतम अग्निहोत्री, कनिष्ठ सहायक प्रितीलता सोनवणे यांच्यासह पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
समुपदेशनाने पदोन्नतीची प्रक्रिया पार पडल्यामुळे सर्व पदोन्नती देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देत मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचे आभार व्यक्त केले.