नाशिक : नाशिकमध्ये येत्या २८ जून ते १२ जुलै पर्यंत पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार नाशिक शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय घामोडी,शिवसेना पक्षातील सदस्यांची बंडखोरी, अग्निपथ सैन्य भरती प्रक्रियेवरून आंदोलने आणि निदर्शने सुरू आहेत,भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनीं मुस्लिम धर्मगुरू यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वादग्रस्त वक्तव्य आणि आगामी सण उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर देशात कुठेही जातीय घटना घडल्यास अश्या घटनेच्या तीव्र प्रतिक्रिया नाशिक शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात देखील उमटण्याची शक्यता असल्याने,२८ जून मध्यरात्री पासून ते १२ जुलै च्या मध्यरात्री पर्यंत नाशिक शहरात १५ दिवसाची जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
नाशिक शहर पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या आदेशानुसार हि जमावबंदी लागू करण्यात आली असून,जो कोणी या आदेशाचे उल्लंघन करताना आढळून येईल त्यावर कायदेशीररित्या कार्यवाही केयी जाणार आहे.