खळबळजनक..! नाशकात एकाच दिवशी, एकाच परिसरात २ आत्महत्या

नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्यात आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. विशेष म्हणजे सामुहिक आत्महत्यांचे प्रकार वाढताना दिसून येत आहे. अशात पुन्हा एकदा नाशिक शहरात  एकाच दिवशी अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एक विद्यार्थी आणि विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली समोर आली आहे. नाशिक शहरातील आडगाव परिसरात ही घटना घडली आहे. एकाच दिवशी समोर आलेल्या या आत्महत्यांच्या दोन्ही घटनांनी खळबळ उडाली आहे.

आत्महत्येची पहिली घटना आडगाव शिवाराती स्वप्नपूर्ती म्हाडा इमारतीत घडली. या घटनेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असणाऱ्या एका २० वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या खोलीत गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. काल सकाळी तिने आत्महत्या केल्याची बाब समोर आली. या प्रकरणात आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कल्याणी राजाराम थापाळे असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. थापाळे ही आडगाव शिवारात असलेल्या स्वप्नपूर्ती हाडा इमारतीत राहत होती. ती आडगाव परिसरात असलेल्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिने आत्महत्या का केली हेअद्याप उघडकीस आले नाही.

दरम्यान आत्महत्येच्या दुसऱ्या घटनेत एका इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरने त्याचे जीवन संपवले आहे. त्याने चौदा मजली इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना देखील आडगाव परिसरात घडली आहे. आडगाव शिवारातील वृंदावननगर येथे १४ मजली इमारतीवरून उडी घेत त्याने आत्महत्या केली. साहिल बापूराव पवार असे आत्महत्या करणाऱ्या इंजिनिअरचे नाव आहे. त्याने गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास राहत्या इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारली. त्यानंतर त्याला तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. या देखील आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाहीये. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येचे अनेक प्रकरणं समोर आले आहे. बाप-लेकांची तिहेरी आत्महत्या, जोडप्यांची आत्महत्या या घटनांनी शहराला हादरवून टाकले होते. दरम्यान आता पुन्हा एकाच परिसरातून आत्महत्येचे दोन वेगवेगळे प्रकरणं समोर आले आहे. दोन्ही आत्म्हत्यांमागे कारण काय याचा तपास पोलीस करत आहे. पोलीस तपासात काय समोर येईल हे पाहणे महत्वाचे राहणार असून एकाच दिवशी समोर आलेल्या या दोन घटनांनी परिसरात खळबळ उडाली आहे.