Home » धारदार शस्त्राने वार करून २४ वर्षीय तरुणाची हत्या..

धारदार शस्त्राने वार करून २४ वर्षीय तरुणाची हत्या..

by नाशिक तक
0 comment

नाशिक : म्हसरूळ परिसरात २४ वर्षीय तरुणाची (youth) धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. यश गांगुर्डे असे २४ वर्षीय मुलाचे नाव आहे. पोटावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या (murder) करण्यात आली आहे.

म्हसरूळ (Mhasarul) परिसरातील दिंडोरी रोडवर युवकाची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर म्हसरूळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पूर्ववैमनस्यातून किंवा वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करत आहे. मात्र, या खळबळजनक घटनेने म्हसरूळ परिसर हादरला आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!