३ भामट्यांनी तृतीयपंथीयांचे वेश धारण केले, घरात मुलगी एकटी पाहून…

जळगाव परिसरात एक खळबळजनक प्रकार घडला आहे. तृतीय पंथीयांच्या वेशातील तीन भामट्यांनी घरात घुसून जबरी लूटीचा प्रयत्न केल्याची घटना घडली हे. शेजार्यांच्या तत्परतेने भामट्यांचा डाव उधळला व तिघांना घरातच पकडून परिसरातील रहिवाश्यांनी बेदम झोडपून पोलिसांच्या हवाली केले आहे. ही घटना जळगाव मधील वाटिकाश्रम परिसरातील आहे. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दिवसा-ढवळ्या असा प्रकार घडल्याने आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

घडलेली घटना अशी की,

तृतीयपंथीयांचा वेश धारण करून तीन चेारट्यांनी रविवार (२५ सप्‍टेंबर) सकाळी १० वाजेच्या सुमारास अमावस्येच्या निमित्ताने वाटिकाश्रम परिसरात भिक्षा मागत फिरत होते. सकाळची वेळ परिसर शांत होता, त्यात एका घरात मुलगी एकटी असल्याची संधी साधत, तिघांपैकी एक घरात शिरला तर, दोघांनी बाहेर पाळत ठेवली. आत गेलेल्या भामट्याने मुलीचा गळा दाबून तिला घरातून पैसे आणायला लावले. मुलीने संधी मिळताच आरडाओरड केल्याने घाई गडबडीत तिघांनी पळ काढला.

एवढ्यावरच न थांबता तेथून पोबारा केल्यानंतर शेजारच्या कॉलनीतील एका घरात घुसले. तेथेही एकाला पैसे मागितले. त्याने पैसे देण्यासाठी पाकीट हातात घेतले असता, तिघांनी त्याचे पाकिट हुसकावून बळजबरीने १ हजार रुपये काढून घेतले. तिघेही दमदाटी करून जबरी लुट करत असल्याचे समोर आल्यानंतर नागरिकांनी त्यांना पकडून बेदम चोप दिला.

आरोपी जेरबंद

नागरिकांनी पोलिसांना फोन करत घटनेची माहिती दिली तालुका पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखाल होत, आरोपींना ताब्यात घेतले. मात्र चोरीचा प्रयत्न दिवसा-ढवळ्या झाला आहे. त्यामुळे चोरांना पोलिसी खाक्या दाखवत यांच्यावर यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी स्थानिकांनी मागणी केई आहे.