धक्कादायक! पाकिस्तानमधील मशिदीत मोठा स्फोट, ३० जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । प्रतिनिधी

पाकिस्तानातील (Pakistan) पेशावर (Peshawar blast) येथील मशिदीत मोठा स्फोट झाला आहे. ज्यामध्ये जवळपास ३० जणांचा मृत्यू झाला असून ५० जण जखमी झाले आहेत. लेडी रीडिंग रुग्णालयात ३० मृतदेह (Deaths In bomb blast) आणण्यात आल्याचे रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ही घटना कोचा रिसालदार परिसरात घडली आहे.

पेशावरचे सीसीपीओ इजाज अहसान यांनी सांगितले की, स्फोटात एका पोलिसाचाही मृत्यू झाला आहे. लेडी रीडिंग रुग्णालयाचे मीडिया मॅनेजर असीम खान यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ३० मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत. पाकिस्तानात याआधीही असे अनेक हल्ले झाले आहेत. पुन्हा एकदा झालेल्या या स्फोटाने पाकिस्तान पुन्हा हादरून गेला आहे. या हल्ल्यामागे कोण आहे. हे मात्र अद्याप समजू शकले नाही.

प्राथमिक अहवालानुसार दोन हल्लेखोरांनी शहरातील किस्सा ख्वानी मार्केटमधील मशिदीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि तेथे पहारा देत असलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. ज्यात एका पोलिसाचा मृत्यू झाला होता. तर दुसरा गंभीर जखमी आहे. हल्ल्यानंतर मशिदीत लोकांना टार्गेट करण्यात आले आणि मोठा स्फोट झाला. या घटनेने पाकिस्तान पुन्हा मोठ्या दहशतीच्या सावटाखाली गेला आहे.

दरम्यान कोचा रिसालदार मशिदीत नमाज अदा करण्यासाठी लोक जमले असताना हा स्फोट झाला. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. या स्फोटाने पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.