Home » ‘शेल्टर २०२२’मुळे नाशिकच्या बाजारात ‘६३७’ कोटींची उलाढाल

‘शेल्टर २०२२’मुळे नाशिकच्या बाजारात ‘६३७’ कोटींची उलाढाल

by नाशिक तक
0 comment

नाशिक : क्रेडाई नाशिक मेट्रोद्वारे डोंगरी वस्तीगृह मैदानावर ५ दिवसीय शेल्टर हे गृहप्रदर्शन (Shelter Exhibition) झाले. या प्रदर्शनास जवळपास ५० हजार नागरिकांनी भेट दिली. ४०० फ्लॅट्स आणि १०० प्लॉटची नोंदणी (400 flats and 100 plots registered) करण्यात आली. या प्रतिसादामुळे नाशिकच्या बाजारात जवळपास ६३७ कोटींची उलाढाल झाल्याची माहिती देण्यात आली आहे. काल (सोमवार, २८ नोव्हेंबर) सायंकाळी शेल्टर २०२२ या प्रदर्शनाचा समारोप झाला.

स्वतःचे हक्काचे स्वप्नातील घर हा प्रत्येक आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा विषय, तसेच रोटी कपडा व मकान या मूलभूत गरजांपैकी एक आहे. प्रत्येकाला स्वप्नातील हक्काचे घर मिळावे यासाठी सतत प्रयत्नशील असणारा समाजातील एक घटक म्हणजे बांधकाम व्यावसायिक. बांधकाम व्यावसायिक स्वतःचे अनुभव व कौशल्य वापरून बांधकामासाठी लागणाऱ्या विविध घटकांचा एकत्रित करून घराची निर्मिती करतो. जसे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी बांधकाम व्यवसायिकाची भूमिका मोलाची असते तसेच शहराच्या विकासामध्ये व अर्थचक्र फिरवण्यामध्ये देखील बांधकाम व्यवसायिकाची भूमिका महत्वपूर्ण ठरते. अशीच एक संकल्पना घेऊन शेल्टर २०२२, क्रेडाई मेट्रोचे नाशिकमध्ये भव्य दालन ५ दिवस सजलेले होते. काल या प्रदर्शनाचा समारोप झाला आहे.

बांधकाम व्यवसाय हा कोणत्याही शहराच्या विकासात मोलाचा हातभार लावतो. अशात एकाच छताखाली विविध पर्याय देण्याचं काम क्रेडाई निरंतर करत आहे. भविष्यात एज्युकेशन, मेडिको टुरिझम आणि ऍग्रो म्हणून नाशिकला पुढे नेण्यासाठी नागरिकांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केंद्र आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी गृहप्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना केलं.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार देवयानी फरांदे, आयजी (पोलीस) बी.जी. शेखर राष्ट्रीय क्रेडाईचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, राष्ट्रीय क्रेडाईच्या घटना समितीचे प्रमुख जितूभाई ठक्कर, सचिव सुनील कोतवाल, सुरेश पाटील, नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन, शेल्टरचे समन्वयक कृणाल पाटील, क्रेडाईचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद खैरनार, प्रायोजक ललित रुंग्टा, दीपक चंदे उपस्थित होते. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले की नाशिक ही पवित्र भूमी असून येथे आपले घर असाव अनेकांचे स्वप्न असतं. आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या की नाशिकची स्काय लाईन बदलत असून बहुमजली ईमारतीमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडत आहे. प्रास्ताविकात क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन यांनी शेल्टरला मिळालेल्या अद्भुत प्रतिसादाबद्दल सांगितलं.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!