नाशिक : ज्ञानदीप आश्रमात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. दरम्यान आता या प्रकरणात नवनवीन माहिती समोर आहे. संशयिताने आणखी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. संबंधित पीडित मुलीसोबत संशयित हर्षल मोरे याने तिन वेळा अपकृत्य केल्याचे समोर आले असून मोबाईलवर घाणेरडे व्हिडीओ दाखवले तसेच मारून टाकण्याची धमकी दिल्याचेही गंभीर आरोप पिडीतेने केले आहे. या प्रकरणात या आधी सहा मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. दरम्यान आता आणखी एका पिडीतेने संशयीताविरोधात लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दिली आहे.
नाशिक येथील म्हसरूळच्या ज्ञानदीप गुरुकुल आधाराश्रमात अल्पवयीन आदिवासी मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणात सहा अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. संशयिताने आणखी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी काल पिडीतीने तक्रार देताच म्हसरुळ पोलीस ठाण्यात मोरे विरोधात अत्याचाराचा सातवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानदीप गुरुकुल आश्रमात संस्थाचालकानेच १४ वर्षीय शाळकरी मुलीला व्हिडीओ दाखवत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी पाेलिस ठाण्यात पीडितेच्या फिर्यादीनुसार बालकांचे लैंगिक अपरधपासून संरक्षण अधिनियम अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल दाखल करण्यात आला होता. त्यानुसार संशयित संस्थाचालकाला पोलिसानी बेड्या ठोकल्या होत्या.
पोलिसांनी आधारश्रमातील इतर मुलींचा जबाब घेतल्यानंतर आश्रमातील तक्रारदार पीडित मुलीसह इतर ६ मुलींवर हर्षल बाळकृष्ण मोरे याने बलात्कार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. संशयित मोरेच्या विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोक्सो कायद्या अंतर्गत पाच गुन्हे दाखल करण्यात आले. तर पुन्हा एका पिडीत मुलीने हर्षल मोरे विरोधात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
सहा अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर सातवी घटना समोर येत आहे. त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती वाढत चालल्याचे चित्र आहे. हे बघता न्यायालयाने संशयिताची पोलीस कोठडी वाढवण्याची विनंती मान्य केली आहे. त्यामुळे आता ६ डिसेंबर पर्यंत संशयित आला नारायण कोठडी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे प्रकरणाचा अधिक सखोल तपास करण्यास पोलिसांना वेळ मिळाला आहे. लैंगिक अत्याचार झालेल्या सात मुलींपैकी सहा विद्यार्थिनी या अल्पवयीन असल्याची माहिती आहे.