नाशिकमध्ये २ वर्षाच्या चिमुकल्याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. शिवबा पवार असं या मृत चिमुरड्याचे नाव असून ही घटना समोर येताच शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहेत.
अशी घडली ही दुर्दैवी घटना
नाशिकचा पवार परिवार वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळ्यात एका व्हीलावर गेला होता. या ठिकाणी २ वर्षीय शिवबा खेळत मग्न होता. तो एकटाच खेळता खेळता स्विमिंग पुल परिसरात आला. पाण्याच्या धोक्याची समज नसलेला शिवबा स्विमिंग पूल जवळ गेला आणि तसाच खेळात त्याचा स्विमिंग पूलमध्ये तोल गेला. स्विमिंग पूलमध्ये पडल्यावर या चिमुकल्याने काही वेळ स्वतः चा वाचण्यासाठी अथक परिश्रम केले. मात्र त्याच्या प्रयत्नांना यश आलं नाही. अखेर त्याचे हातपाय थकले आणि त्याचा जीव गेला.
पहा व्हिडिओ..
मुलाचा मृतदेह पाहून आई – वडिलांनी फोडला हंबरडा
बराच वेळ झाला मुलगा दिसत नाही म्हणून परिवाराने त्याची शोधाशोध सुरू केली. सर्व व्हीला पालथा घातला आणि शेवटी मुलाच्या आई वडिलांचे पाय स्विमिंग पुलकडे वळले. स्विमिंग पुलजवळ येताच आई वडिलांना त्यांच्या मुलाचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. हे दृश्य पाहताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि आई वडिलांनी जोरात हंबरडा फोडला. हा सर्व प्रकार स्विमिंग पूल परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होतेय. त्यासोबतच या घटनेतून लहान मुलांची बारकाईने काळजी घेणे किती गरजेचे असा धडा इतर पालकांना मिळतोय.