स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी केंद्र सरकार चा मोठा निर्णय

नवी दिल्ली : १८ वर्षावरील नागरिकांना पुढील ७५ दिवस मोफत बूस्टर डोस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्या देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. म्हणजेच स्वातंत्र्याचे ७५ व्या वर्ष, हे वर्ष अमृतमोहोत्सवी वर्ष आहे म्हणून संपूर्ण देशभरात या निमित्त नवनवीन उपक्रम राबवली जात आहे. नवनवीन योजना आखल्या जात आहे. आणि याचच एक भाग म्हणून १५ जुलै पासून म्हणजेच पुढील दोन दिवसापासून ते पुढचे ७५ दिवस १८ वयोगटावरील सर्व नागरिकांना कोविडचा लसीचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे, याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.


आतापर्यंतच्या माहितीनुसार सरासरी भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने १९९.१२ (१,९९,१२,७९,०१०)  कोटींचा टप्पा पार केला आहे . देशातील १२ ते १४ वर्ष वयोगटासाठी १६ मार्च २०२२ रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत ३.७६(३,७६,२८,२९३) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १० एप्रिल, २०२२ पासून  १८ ते ५९ वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. 
आता १५जुलै पासून पुन्हा बूस्टर डोस लसीकरण मोहिमेला झपाट्याने वेग येईल.


पुढील ७५ दिवस हा बूस्टर डोस १८ वयोगटावरील नागरिकांसाठी मोफत असणार आहे.
ज्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत आणि त्यांना दोन्ही डोस घेऊन सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ लोटला असेल त्या व्यक्ती हा बूस्टर डोस घेऊ शकतील. त्यासाठी त्यांना जवळच्या खाजगी लसीकरण केंद्रावर बूस्टर डोससाठी नोंदणी करावी लागेल.