नाशिकच्या (Nashik) एका उद्योजकाने राहत्या घरी आत्महत्या (A businessman committed suicide) केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडलीये. या उद्योजकाने राहत्या घरात स्वतःला गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रोशन गोयल असे या आत्महत्या करणाऱ्या उद्योजकाचे नाव होते. गोयल हे टोमॅटोचा व्यवसाय करत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अशात रमेश गोयल यांनी आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. दरम्यान या प्रकरणी आडगाव पोलीस घटनास्थळी धाव घेत प्रथम रेवोल्व्हर ताब्यात घेतला आहे.
रोशन गोयल यांच्या आत्महत्येने परिवारात अत्यंत शोकाकुल वातावरण आहे. या घटनेने परिसरात देखील हळहळ व्यक्त होत आहे. गोयल यांच्या आत्महत्येमागचे कारण समोर आले नसून घटनेचा पुढील तपास आडगाव पोलिसांकडून सुरू आहे.