वणी येथे कार-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; सहा जण ठार झाल्याची माहिती..

चैतन्य गायकवाड |

वणी : कळवण (Kalvan) तालुक्यातील वणी (Vani) जवळील मुळाणे बारी (Mulane Bari) इथे भीषण अपघात झाला आहे. मार्कंडेय पर्वताच्या पायथ्याशी हा अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टर पलटी होऊन अल्टो कारवर (Alto car) पडल्याने सहा जण जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात १० ते १५ जण जखमी (injured) झाले आहे. जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील मुळाने बारी येथे समोरून येणारा ट्रॅक्टर (tracter) पलटी होऊन तो अल्टो कारवर जाऊन आदळला. या धडकेत अल्टो कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. वणीच्या डोंगराजवळ असलेल्या मार्कंडेय पर्वताच्या पायथ्याशी हा अपघात झाला. या भीषण अपघातात सहा जण ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. तर जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहे.