बलात्कार पीडितेला धमकावल्याप्रकरणी केदार दिघेंवर गुन्हा दाखल ! 

ठाणे : धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे आणि शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बलात्कार पीडित तरुणीला धमकावल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत मिळालेली माहिती अशी कि , केदार दिघे यांचे मित्र आणि मुख्य आरोपी रोहित कपूर यानं २८ जुलै रोजी लोअर परेळ येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये एका तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपी कपूर यानं धनादेश देण्यासाठी पीडितेला हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर बलात्कार केला असा आरोप करण्यात आला आहे.



या प्रकरणातील तक्रारदार महिला खाजगी कंपनीत क्लब अॅम्बेसिटर आहे . त्या लोअर परेल, मुंबई भागातील एका हॉटेलमध्ये येणाऱ्या गेस्टना अटेन्ड करणं क्लब मॅरेट मेम्बरशीपबाबत माहिती देण्याचे काम करतात . २८ जुलै रोजी तक्रारदार महिलेस आरोपी रोहित कपूर याने क्लब मेरेट मेम्बरशीप घेतो असे सांगून बोलावून घेतले त्यांतर मेम्बरशीपचे पैसे देण्याच्या बहाण्याने तो थांबलेल्या रुममध्ये गेऊन गेला सदर महिला त्या रुममध्ये गेली असता तिच्यावर आरोपी रोहित कपूर याने लैगिंक अत्याचार केला.


तक्रारदार तरुणीनं गुन्हा दाखल करण्यासाठी सोमवारी पोलिसांशी संपर्क साधला होता. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबत पीडित तरुणीने तक्रार करू नये, यासाठी केदार दिघे यांनी तिला धमकी दिल्याचा आरोप पीडित तरुणीनं तक्रारीत केला आहे. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी मुख्य आरोपी रोहित कपूर याच्यावर कलम ३७६ नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तर केदार दिघे यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६ (गुन्हेगारी धमकी) चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .