वकिलावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

पुणे येथील शिवाजीनगर येथे एका वकिलाने कनिष्ठ महिला वकिलाचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे . या प्रकरणी एका वकिलाच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .ॲड. धर्मराज विनायक जाधव (वय ४०, रा. वाघोली) असे गुन्हा दाखल केलेल्या वकिलाचे नाव आहे. याबाबत एका महिला वकिलाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती . तक्रारदार वकील महिला ॲड. जाधव यांच्याकडे कनिष्ठ वकील म्हणून काम करत आहे.


तक्रारदार वकील महिला आणि ॲड. जाधव काही दिवसांपूर्वी नगर रस्त्यावरुन वाहनातून येत होते. त्या वेळी ॲड. जाधव यांनी जाणीवपूर्वक गाणे म्हणून लज्जास्पद वर्तन केले. त्यानंतर महिला वकिलाचा शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात विनयभंग केला. महिला वकिलाने या प्रकाराची माहिती पतीला दिली. तेव्हा ॲड. जाधव यांनी दोघांना धमकावले तसेच त्यांना धक्काबुक्की केली. घाबरलेल्या महिला वकिलाने ॲड. जाधव यांच्या विरोधात तक्रार दिली. पिडीत महिला वकिलाच्या तक्रारीवरून संशयित वकिलावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.