किक बॉक्सिंग मुळे स्पर्धकाला गमवावा लागला जीव

बेंगळुरू: येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत एका स्पर्धकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना बेंगळूरू येथे घडली आहे. यामुळे संपूर्ण क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. ९-१० जुलै रोजी राज्यस्तरीय किक बॉक्सिंगची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत तेवीस वर्षाचा किक बॉक्सर नितीन सुरेश या स्पर्धकाला दुखापत झाली होती. दुखापत झाल्यानंतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण गुरुवारी त्याचे निधन झाले.

निखिल हा किक बॉक्सिंग मधला नावाजलेला खेळाडू होता. अनेक स्पर्धा त्याने सहभाग नोंदवला होता.
बॉक्सर नितीन सुरेश च्या कुटुंबातील लोकांनी आणि प्रशिक्षकानी या स्पर्धेच्या आयोजकांवर बेजबाबदारपणाचा आरोप केला आहे.स्पर्धेच्या ठिकाणी रुग्णवाहिका आणि कुठल्याही प्रकारची वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हती,नितीन ला वेळेत उपचार मिळाले नाही त्यामुळे त्याचा जीव गेला असा आरोप कुटुंबातील लोकांनी केला.अश्या स्पर्धेच्या वेळेस रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सेवा यांची सोय करणे ही आयोजकांनी जबाबदारी असते. कोणत्याही मार्शलआर्ट स्पर्धेत रुग्णवाहिका ही असावीच लागते.पण त्याची सोय नव्हती त्यामुळे नितीनला वेळेत उपचार नाही मिळू न शकल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.


ही घटना घडताच आयोजक फरार झाले आहेत. राष्ट्रीय किक बॉक्सिंग असोसिएशनने देखील या स्पर्धेशी आपला कोणताही,काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
निखिल हा किक बॉक्सिंग मधला नावाजलेला खेळाडू होता. त्याचा जाण्याने सर्वच स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे. त्याचे प्रशिक्षकांनी सोशल मिडीयावर भावनिक पोस्ट टाकलेली आहे. त्यात ते दु:ख व्यक्त करताना दिसत आहेत.