उघड्यावर फेकले एक दिवसीय स्त्री अर्भक; बेवारस प्राण्यांनी मांस खाल्याने..!

नाशिक : शहरातील अंबड परिसरात मनुष्य जातीला काळिमा फासणारा प्रकार समोर आला आहे. अंबडच्या अंबिका नगर, दत्तनगर चुंचाळे शिवार (Ambad’s Ambika Nagar, Dattanagar Chunchale Shivar) येथे एका अज्ञाताने एक दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक फेकून (Female infant thrown away) दिले. परिसरातील बेवारस प्राण्यांनी या अर्भकाचे मांस खाल्ल्याने अर्भाकाचा मृत्यू झाला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. स्त्री जातीचे असल्यामुळे हे अर्भक फेकले गेले आहेत का ? स्त्री जन्माचा अद्यापही तेवढाच तिरस्कार केला जातोय का असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहे.

28 नोव्हेंबर रोजी, ११ वाजेच्या दरम्यान एका अज्ञात इसमाने एक दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक (A day old infant threw up) पाण्याच्या टाकीजवळ अंबिका नगर, दत्तनगर चुंचाळे शिवार अंबड येथे टाकून दिल्याने तेथे असलेल्या बेवारस प्राण्यांनी सदर अर्भकाचे शरीराच्या विविध भागाचे मांस खाल्ले. त्यामुळे त्यातून रक्तस्त्राव होऊ लागला आणि सदर अर्भक मयत झाले. घटनेचा हा सर्व प्रकार परिसरातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून याप्रकरणी अंबड पोलिस ठाणे (Ambad Police Station) येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्त्री जातीचे हे अर्भक भागवत बुधा पाटील यांच्या घरा जवळ प्लॉट नंबर ५४४ पाण्याच्या टाकी जवळ, अंबिका नगर, दत्तनगर चुंचाळे शिवार अंबड येथे टाकून दिले होते. बेवारस प्राण्यांनी खाल्लेल्या या मृत अर्भकाचा वास येऊ घटन उघडकीस आली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. त्यानंतर उरलेले हे अर्भक पोलिसांनी ताब्यात घेतले. परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता एका अज्ञाताने हे एक दिवसाचे जिवंत स्त्री अर्भक या भागात फेकल्याचे निदर्शनास आले.

घटनेतील संशयित आरोपी अद्याप अटकेत नाहीये. पोलिस त्याचा तपास करत असून त्याच्यावर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड पोलिसांत गुरनं ०५४२/२०२२ भा. द. वी कलम ३१७ प्रमाणे संशयीता विरोधात गुन्हा दाखल आहे. या घटनेचा पुढील तपास सह पोलिस निरीक्षक खतेले हे करत आहेत. तपासाअंती हे अर्भक स्त्री जातीचे होते म्हणून फेकले गेले की काही इतर कारण होते ही बाब उघडकीस येईल.