Home » ‘एक मुलगी माझ्याशी न बोलता इतर मुलांशी बोलते’; विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल

‘एक मुलगी माझ्याशी न बोलता इतर मुलांशी बोलते’; विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल

by नाशिक तक
0 comment

बुलढाणा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम-प्रकरणातून एका विद्यार्थ्याने महाविद्यालयातील सिलिंग फॅनला गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयातीळ आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेकांना धक्काच बसलाय. सूरज रामकृष्ण गावंडे (रा. येणंगाव ता. जामोद जि. जळगाव) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षाला होता. पोलिसांना विद्यार्थ्याच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट देखील सापडली असून त्यात हे धक्कादायक पाऊल का उचलले याचे कारण आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल बुधवारी संध्याकाळच्या वेळी सुरक्षारक्षक महाविद्यालयात असता त्याने महाविद्यालयाच्या एका खोलीतले चित्र पहिले तर सुरक्षारक्षकच्या पायाखालची जमीनच सरकली. वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या वर्ग खोलीतच सीलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तेव्हा या सुरक्षारक्षकाने तत्काळ घटनास्थळी पोलिसांना बोलावले.

पोलिसांनी तपासणी केली असता, मृतदेहाच्या शेजारी सुसाईड नोट देखील आढळली. ज्यात ‘एक मुलगी माझ्याशी न बोलता इतर मुलांशी बोलते’ असा आशय होता. या सुसाईड नोटमध्ये होता. यावरून प्रेम प्रकरणातून आलेल्या नैराश्यामुळे या विद्यार्थ्याने हे धक्कादायक पाऊल उचल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते, पोलिसांनी विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करुन चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडली आहे. विद्यार्थ्याने असे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!