अलंगुण पुरग्रस्तांना स्वामी समर्थ सेवेक-यां तर्फे मदतीचा हात

सुरगाणा तालुक्यातील अलंगुण गावचा बंधारा फुटला होता. गावात पूर्ण पाणी शिरले होतो. अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते. अश्यातच अलंगुण गावात पूरग्रस्तांना सुरगाणा येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या सेवेकरींकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटत करण्यात आले आहे . मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या भावनेतून विविध सामाजिक सेवेकरींकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या भावनेतून विविध सामाजिक संघटनांनी मदतीचा हात पुढे केला असून यामुळे पुरात नुकसान झालेल्या कुटुंबाना पुर्वपदावर येण्यास मोठी मदत होणार आहे.


अतिवृष्टीमुळे अलंगुण येथील बंधाऱ्याचा सांडवा धसून गावात मोठा पूर आला होता. पुरात घरांचे व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान तसेच आदिवासी बांधव व विविध सामाजिक संस्थांकडून नुकसानग्रस्त कुटुंबाना सर्वतोपरी मदत दिली जात आहे. येथील श्री स्वामी समर्थ मठ सुरगाणा चे सर्व सेवेकरी वृंदाकडून नुकसान झालेल्या कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार जे. पी. गावित, माजी सभापती इंद्रजित गावित, मठाचे अध्यक्ष नितीन महाले, हिरामण गावित, हरिश्चंद्र आहेर, नगरसेवक सचिन महाले, उपप्रादेशिक व्यवस्थापक तुषार मोरे, उत्तमचंद पगारिया, प्रशांत मोरे, राजेश पवार, निलेश थोरात, सोना पगारिया, ओम जंगम, चेतन आहेर, अंकुश, ओम बोरसे, ज्ञानेश जंगम, शुभम सूर्यवंशी आदी सेवेकरी वृंद यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. विविध स्तरावरून सहकार्य मिळत असून यामुळे पूरग्रस्तांचे संसार व जीवन पूर्वपदावर येण्यास मदत होत आहे.