प्रेमात कोण काय करेल याला काही सीमा नसते. प्रेम अंध असत अस म्हणतात आणि याची प्रचीती ही हटके ‘प्यार वाली लव स्टोरी’ वाचून तुम्हाला येईलच. या प्रेम कहाणीत एका महिला जेलर आणि कैद्याची आहे. एक महिला जेलर कैद्याच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासाठी चक्क तिने आयफोनची तस्करी देखील केली. या प्रेम कहाणीची चर्चा सध्या सर्व जगात होत आहे.
ही कहाणी आहे युकेमधली. एम्मा नावाची महिला जेलर मार्क्स सोलोमन नावाची कैद्याच्या प्रेमात पडली. त्याच्या प्रेमात तिला आपल्या कर्तव्याच भानही राहील नाही आणि प्रियकर कैद्यासाठी तिने नियम मोडीत काढले. तिने सोलोमनसाठी आयफोनची तस्करी करण्यास सुरुवात केली. एवढच नाही तर कारागृहात चेकिंग कधी होणार याची देखील वेळोवेळी माहिती एम्मा देऊ लागली. पण ते म्हणतात ना सत्य जास्त वेळ लपून नाही राहत तसच काही एम्मा सोबत झाले. एम्माचे भांडे फुटले आणि जेलरला प्रेमापोटी जेलची हवा खावी लागली. ‘कैद्याच्या प्रेमात पडण मान्य आहे. मात्र, त्यासाठी अशाप्रकारे विश्वासाचा गैरवापर करणे मान्य नाही’, असे म्हणत न्यायाधीशाने एम्माला १५ महिन्यांची शिक्षा सुनावली. त्यासोबतच तिला नोकरीवरून देखील रफादफा केले.
याप्रकरणाच्या चौकशी दरम्यान एम्मा आणि सोलोमन मध्ये झालेली सर्ब बातचीत समोर आली. त्यांच्यात बरीच चर्चा झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली . सोलोमन तस्करीचे फोन विकून त्याचे पैसे एम्माच्या खात्यावर टाकत असल्याची बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली. दोघांचे मोबाईलवरचे संदेश पोलिसांनी न्यायालयापुढे मांडल्यानंतर हे दोघेही वेगवेगळ्या प्रकारच्या आयफोन खरेदी आणि विक्रीबद्दल बोलायचे हे कळाल. त्यामुळे सध्या हे दोघेही प्रेमी जेलची हवा खाताय. असं असल तरी त्यांच्या प्रेमाची चर्चा सात समुद्रापार पोहोचली आणि प्रेमासाठी वाट्टेल ते याची प्रचीत पुन्हा एकदा जगाला आली.