शाळकरी मुलीची छेड काढली म्हणून कपडे फाटेपर्यंत चोपला

नाशिक: शहरात एका शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या एका टवाळखोराला मुलीच्या आईवडिलांनी आणि नागरिकांनी चांगलाच धडा शिकवला आहे(A man who molested a schoolgirl in the city was taught a lesson by the girl’s parents and citizens). पाथर्डी फाटा (Pathardi Phata, Nashik) परिसरातील ही घटना आहे. शाळा सुटल्यानंतर मुलगी घरी परतत असताना एका तरुणाने तिची छेड काढली होती. सुरुवातीला मुलीने याकडे दुर्लक्ष केले मात्र वारंवार तरुण पिच्छा करत असल्याने मुलीने ही बाब तिच्या पालकांच्या कानावर घातली. पालकांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेत त्याला विचारणा केली. त्यावेळी त्याने उडवाउडवीचे उत्तर दिल्याने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

पहा व्हिडिओ

तरुणाला मारहाण करताना पाहून या ठिकाणी नागरिकांची गर्दी झाली कारण कळाल्यानंतर त्यांनीही तरुणाला मारण्यास सुरुवात केली. तरुणाचे अक्षरशः कपडे फाटेपर्यंत तरुणाला मारहाण करण्यात आली. मारहाण होताना पाहून काय झाले या उत्सुकतेने गर्दी वाढू लागली आणि कारण समजल्यानंतर ज्याला शक्य होईल तो येऊन मारहाण करून जात होता. दरम्यान काही नागरिकांनी या सर्व प्रकारचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेयर केला. त्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. घटनास्थळी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले, त्यांनी टवाळखोर तरुणाला ताब्यात घेतले. तेव्हा या तरुणाने मद्यसेवन केल्याचेही समोर आले.

शाळेच्या आजूबाजूला टवाळखोरांचा नेहमीच वावर असतो, त्यामुळे पोलीसही तिथे पेट्रोलिंग करत असतात. त्यामुळे टवाळखोर मुलं मुलींना घराच्या दिशेने जातांना छेडछाड करण्याचा प्रयत्न करत आहे. नाशिक शहरात काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. शालेय मुलीला तुझ्या भावाला कोणी तरी पकडून ठेवल्याचे खोटे सांगत, तीला मंदिराजवळ बोलून घेत ब्लाॅक का केले. याचा जाब विचारत मैत्रिणीच्या भावाने आणि त्याच्या दोन मित्रांनी विनयभंग केल्याचा प्रकार एका शाळेच्या जवळ उघडकीस आला होता. संशयिताच्या विरोधात उपनगर पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटना पाहता शहरात मुलींची छेडछाड आणि विनयभंगाच्या घटना वाढताना दिसत आहे.