नाशिक : नाशिक (Nashik) शहरात खुनाची (murder) मालिका सुरूच असून शुक्रवारी भल्या पहाटे आणखी एक खून झाला. पुणे (Pune) येथील व्यक्तीचा पौर्णिमा बस स्टॉप जवळ खून झाल्याची घटना घडली आहे. हरीश पाटील (Harish Patil) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो पुणे येथील रहिवासी आहे. त्याच्या खिशात आधार कार्ड सापडले असून त्यावरून त्याची ओळख स्पष्ट झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त (DCP) संजय बारकुंड यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. लुटमारीच्या उद्देशाने हा खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्याची पोलिसांनी तपासणी केली. त्यातून असे चित्र समोर आले की, एक व्यक्ती रस्त्याच्या कडेने जाताना दिसतो. त्यानंतर पाठीमागून तीन ते चार जणांचे टोळके येताना दिसते. त्यांनतर या टोळक्याने त्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने सपासप वार केल्याचे दिसत आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि या व्यक्तीने जीव सोडला. या प्रकरणी वरीष्ठ पोलिस निरीक्षक (PI) साजन सोनवणे, आचल मुदगल हे घटनास्थळी तपास करत आहे.
दरम्यान, ही घटना ताजी असतानाच गंगापूर रोड (Gangapur road) येथील आनंदवली भागात युवकाची हत्या करण्यात आली आहे. अभोणा (Abhona) येथे फार्मसीचे शिक्षण घेत असलेला विपुल खैरे (Vipul Khaire) याचा खून करण्यात आला आहे. तो या परिसरात कसा आला याबाबत गूढ कायम आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात काही नागरिक फिरत असताना त्यांना दुचाकी (bike) व एक bag पडलेली दिसली. काही अंतरावर पाहिले असता त्यांना मृतदेह असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. विपुल खैरे हा डीजीपी नगर येथील येथील रहिवासी असल्याचे समजते. पोलिसांनी या युवकाच्या कुटुंबियांशी संपर्क साधला असता तो अभोणा येथे गेला होता. या ठिकाणी कसा आला यावर कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला. दरम्यान पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहे.
दरम्यान, शहरात २४ तासांत खुनाची ही तिसरी घटना घडली आहे. काल म्हसरूळ (Mhasarul) परिसरात यश गांगुर्डे (Yash Gangurde) नामक तरुणाची धारदार शस्त्राने वर करून हत्या करण्यात आली होती. शहरात गुन्हेगारी घटनांची मालिका सुरूच असून पोलिसांचा धाक कमी झालाय का, असा प्रश्न निर्माण होतो. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता एकट्याने बाहेर फिरणे काळजीचे बनले आहे. गेल्याच महिन्यात नाशिक पोलिस आयुक्तपदी (Commissioner) जयंत नाईकनवरे (Jayant Naiknavare) यांची नियुक्ती करण्यात आली. या घटनांची मालिका ही आयुक्तांसाठी परीक्षेचा काळ आहे. याप्रकरणी पोलिसांना कठोर पावले उचलावी लागणार असल्याचे स्पष्ट होते.