एका तरुणाच दोन तरुणींशी लग्न हा राज्यात चर्चेचा विषय ठरला. हे लग्न प्रचंड व्हायरल झाल असून यात नवऱ्या मुलावर गुन्हा देखील झाला असून तो आता चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे. आता या प्रकरणात आणखी एक मोठा आश्चर्यकारक आणि तेवढाच धक्कादायक खुलासा झाला आहे. हा खुलासा ऐकून तुम्हीही चक्राऊन जाल. २ डिसेंबर 2022 रोजी मुंबईतील एका तरुणाने सोलापूरातील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केलं. यानंतर त्यांच्या या आगळ्या-वेगळ्या लग्नाचे फोटो प्रचंड व्हायरल झाले. अनेकांना याचा हेवा वाटला अनेक नाराज झाले. त्यात काही म्हणाले, ” आम्हाला इथे एक भेटणा, आणि भाऊ दोघींशी लग्न करतोय.”
त्यात हे लग्न व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची दखल घेत या तरुणावर गुन्हा दाखल केला. महिला आयोगाने याची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले. आता या प्रकरणात एक नवीन धक्कादायक खुलासा झाला असून तो म्हणजे, दोन जुळ्या बहिणींशी लग्न करणारा हा तरुण अतुल अवताडे याचे आधीच एक लग्न झाले आहे.
अतुलच्या पहिल्या पत्नीने राज्य महिला आयोगाकडे याबाबतची तक्रार दाखल केली असून आता या प्रकरणाने चांगलीच खळबळ उडवून टाकली आहे. आता अतुलवर आणखी गुन्हे दाखल होणाची शक्यता असून त्याच्यासोबतच दोन्ही जुळ्या बहिणांवर सुद्धा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
पोलिस याप्रकरणाची चौकशी करत आहेत. अतुल अवताडे हा चांगलाच कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. आधीच एक लग्न असताना पुन्हा दुसऱ्यांदा जुळ्या बहिणींशी लग्नाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
अशी जुळली होती रेशमगाठ
जुळ्या बहिणींशी लग्न करणारा अतुल अवताडे हा माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील मूळ रहिवासी आहे. त्याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. तर त्याच्यासोबत लग्नगाठ बांधणाऱ्या दोन तरुणी पिंकी मिलिंद पाडगावकर आणि रिंकी मिलिंद पाडगावकर या जुळ्या बहिणी आहेत.
दोघीही आयटी इंजिनिअर आहेत. पिंकी आणि रिंकीला एकमेकींबद्दल अतिशय ओढा असून आजवर त्या दोघी एकाच ताटात जेवतात असे काही जणांनी सांगितले. बालपणापासून एकत्र राहत असलेल्या पिंकी आणि रिंकीला शेवटपर्यंत सोबतच राहायचं आहे. त्यामुळेच त्यांनी एकाच तरुणाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता.
रिंकी आणि पिंकी या दोन्ही जुळ्या बहिणी आपल्या वडिलांच्या पश्चात विधवा आईसह एकत्र राहायच्या. एकेदिवशी आईसह दोन्ही जुळ्या बहिणी आजारी पडल्या. त्यांना अतुल याने रूग्णालयात दाखल केले होते. टॕक्सी वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या अतुल याने दोन्ही रिंकी आणि पिंकीसह त्यांच्या आईला आजारपणात केलेली मदत मोलाची होती. घरात पुरूष नसल्यामुळे अतुल आधार बनला होता. दरम्यान, दोन्ही जुळ्या बहिणींपैकी एकीचा अतुलवर जीव जडला आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.