तरूणांच विशेष आकर्षण,यामाहा RX-100 भारतात पुन्हा होणार लॉन्च

नव्वदीच्या दशकातील तरुणांचं पाहिलं प्रेम, तरुणांच्या मनात रुतून बसलेली आणि जिच्या आवाजाने सर्वांनाच भुरळ घातलेली अशी यामाहा आरएक्स-१०० पुन्हा एकदा नव्या अंदाजात भारतीयांना भुरळ घालण्यासाठी येत आहे. हो यामाहा मोटार इंडिया चे चेअरमन ईशिन चिहाना यांनी सांगितले आहे की लवकरच यामाहा आरएक्स-१०० भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणार आहे. यासाठी कंपनीने तयारी सुरू केली आहे.
परंतु, इंजिनाच्या बाबतीत तांत्रिक अडचणी आणि त्याच्या अभावामुळे जसेच्या तसे जुने मॉडेल आणणे शक्य नाही, त्यामुळे त्याला थोडीशी आधुनिकतेची जोड देऊन आरएक्स-१०० ची जुनी ओळख कायम ठेवून आरएक्स-१०० भारतीयांच्या सेवेत दाखल होणार आहे.


नवी यामाहा आरएक्स-१०० नव्या अंदाजात पुढील काही वर्षांत बाजारपेठेत दाखल होणार आहे. याला वेळ लागणार आहे कारण, कंपनी यामाहा आरएक्स-१०० ला लवकरात लवकर रीलॉन्च करण्याचा मानस ठवते, पण यात अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत, आणि त्यात मुख्य अडचण म्हणजे आरएक्स-१०० टू-स्ट्रोक इंजिनसह उपलब्ध होती, सध्या टू-स्ट्रोकसह बीएस-६ इंजिनला अनुकूल असे इंजिन बनवणे शक्य नाही, त्यामुळे याला पर्याय शोधण्यात येत आहे. आणि आरएक्स-१०० चे नवे मॉडेल नव्या इंजिनसह आधुनिक पद्धतीने सादर करण्यात येणार आहे. पण या गोष्टीसाठी अनेक वर्ष लागणार आहेत असे कंपनीचे चेअरमन चिहाना यांनी सांगितले. सोबतच नव्या दमात गाडी बाजारपेठेत दाखल करण्याचा प्लॅन देखील तयार आहे असे देखील ते म्हणाले.


आरएक्स-१०० च तेच जुने इंजिन उपलब्ध करून देता येणार नाही त्यामुळे या नव्या मॉडेल च नाव दुसरं ठेवण्यात येणार आहे. कंपनी नव्या मॉडेल साठी आरएक्स-१०० च्या ब्रॅण्ड इमेजला धक्का पोहचवण्याची रिस्क कंपनी घेणार नाही. त्यामुळे नवी आरएक्स-१०० चे नवे मॉडेल नव्या नावाने, नव्या अंदाजात तयात करण्यात येणार आहे. आरएक्स-१०० म्हणजे काहीतरी औरच बात होती, आताच्या लाखोंच्या-करोडोंच्या गाड्या घेऊन फिरण्यात देखोल इतकी शान वाटत नसेल तितकी त्यावेळी तरुणांना आरएक्स-१०० घेऊन फिरण्यातच शान वाटायची, पिक्चर मध्ये हिरो असो वा व्हिलन या गाडीवर फिरण्यात शान मानायचे, कॉलेजचे तरुणाईचे तर आरएक्स-१०० चे विशेष आकर्षण होते.

यामाहा आरएक्स-१०० चा इतिहास

यामाहा आरएक्स-१०० भारतीय बाजारपेठेत १९८५ च्या सुमारास आणली गेली होती. खास जपानवरून पाच हजार बाईक मागवण्यात आल्या होत्या. यामाहा आरएक्स-१०० या दुचाकी चे वजन आवघ ९८ किलो होत, इंजिन १०० सीसी , ११ बीएच टू-स्ट्रोक इंजिन आणि ७,५०० चा आर पी एम सह उपलब्ध होती.