श्रीलंकेत परिस्थिती गेली हाताबाहेर; आणीबाणी जाहीर

श्रीलंका सध्या आर्थिक संकटाशी झुंज देत आहे. अशात आता श्रीलंकेत आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. श्रीलंकेचा इतिहास पाहिला तर याआधी श्रीलंकेवर एवढी वाईट परिस्थिती कधीच आली नव्हती. श्रीलंका इतिहासातील सर्वात वाईट टप्प्यातून जात असल्याच देखील म्हंटले जात आहे. अशात श्रीलंकेत आणीबाणी लागु होणार आहे.

आणीबाणी म्हणजे काय?

आणीबाणी असा काळ असतो जेव्हा प्रस्थापित शासकीय यंत्रणा चालवणे अवघड होते. काही कारणांमुळे ही यंत्रणा कोलमडून लागते. श्रीलंकेमध्ये हे कारण आर्थिक संकट आहे. आणीबाणी म्हणजे अशी परिस्थिती ज्यामध्ये राज्याला तात्काळ लगेचच कृती करणे आवश्यक असते. भारतासारख्या विस्तृत देशामध्ये केंद्र सरकारकडे किंबहुना राष्ट्रपतीकडे जातात. मात्र, श्रीलंकेच्या घटनेनुसार आणीबाणीत सर्वाधिकार पंतप्रधानकडे जातात.

राष्ट्रपती गोतबाया देश सोडून मालदीवला पळू गेले आहेत. गोतबाया यांनी देश सोडल्याने नागरिकांचा राग वाढला. नागरिकांनी राजधानी कोलंबोच्या रस्त्यावर आंदोलन सुरू केले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी आणीबाणीची घोषणा केली. त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत आता आणीबाणीची लागू होणार आहे. श्रीलंकेच्या घटनेनुसार राष्ट्रपतींनी राजीनामा दिला तर कार्यवाहक राष्ट्रपतींची धुरा पंतप्रधानाच्या हातात येते. सध्या श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे आहे. मात्र या स्थितीत त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे.

सध्या श्रीलंकेचे चित्र पाहिले तर आर्थिक संकटातून श्रीलंकेची वाटचाल गरीबीकडे होत आहे. त्यामुळे तेथील जनता सरकारविरोधात नाराज आहे. लोक रस्त्यावर आले आहेत. लोकांकडून रस्त्यावर बेकायदा गर्दी केली जात आहे. सरकारविरोधात नाराजी देखील दर्शविली जात आहे. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे देश सोडून मालदीवमध्ये पळून गेले. त्यांच्या विरोधात नागरिकांकडून आंदोलन करण्यात आले. शेकडो संतप्त आंदोलक राष्ट्राध्यक्षांच्या सरकारी निवासस्थानात घुसले. राष्ट्राध्यक्षांच्या सरकारी निवासस्थानात डेरा टाकलेल्या नागरिकांनी त्याठिकाणी असलेल्या सर्व सोयी सुविधांचा आनंद लुटला.