Home » नाशकातील भीषण अपघाताची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

नाशकातील भीषण अपघाताची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

by नाशिक तक
0 comment

नाशिक : जिल्ह्यात अपघातांचे (Nashik accident) सत्र सुरु असताना मुंबई नाका चौकात (accident at Mumbai Naka) भीषण अपघात झाल्याची पुन्हा एक घटना समोर येत आहे. हा भीषण अपघात सीसीटीव्ही (cctv footage) कॅमेरात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ ‘नाशिक तक’च्या हाती लागली आहे. या घटनेत एका दुचाकी चालकाने रस्त्यावर पायी चालणाऱ्या इसमाला उडवले आहे. नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील हा अपघात आहे.

या घटनेत एका दुचाकी चालकाने रस्त्यावर पायी चालणाऱ्या इसमाला उडवले (A bike rider hit a pedestrian on the road) असून अपघातात दोन जण जखमी (Two people injured) झाल्याची माहिती आहे. या संदर्भात मुंबई नाका पोलीस ठाण्यात(Mumbai Naka Police Station) तक्रार दाखल करण्यात आली असून जखमींना उपचारसाठी जिल्हा रुग्णालयात (District Hospital, Nashik) दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर पुढील उपचार सुरु असून शहरासह जिल्हाभरात अपघातांची मालिका सुरूच आहे.

  • नाशिकच्या मुंबई नाका चौकात भीषण अपघात घटना cctv कॅमेरात कैद
  • एका दुचाकी चालकाने रस्त्यावर पायी चालणाऱ्या इसमाला उडवले
  • अपघातात दोन जण जखमी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
  • जखमींना उपचारसाठी जिल्हा रुग्णालयात केले दाखल

पहा अपघाताचा थरारक व्हिडिओ

नाशिक शहरासह जिल्हाभरात सध्या अपघातांची मालिका सुरु आहे. एक घटना ताजी असतानाच पुन्हा भीषण अपघाताची दुसरी घटना समोर येऊन उभी राहते. ८ डिसेंबर रोजी सिन्नर महामार्गावर झालेला ३ वाहनांचा विचित्र अपघात ताजाच होता की दुसऱ्या दिवशी म्हणजे काल (९ डिसेंबर) सिन्नर मोहदरी घाटात कारचा भयानक अपघात झाल्याची घटना समोर आली. या दोन्ही घटना अत्यंत भयानक होत्या. पहिल्या घटनेत तर ८ ऑक्टोबर रोजी मिरची हॉटेल जवळ झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती थोडक्यात टळली मात्र बर्निंग बसच्या थराराने त्या अपघाताचे विदारक चित्र पुन्हा एकदा समोर उभे केले. दुसऱ्या म्हणजेच सिन्नर मोहदरी घाटातील कारचे टायर फुटून झालेल्या अपघात पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा लग्नातून परतताना अपघात झाला. या दोन्ही घटनांमध्ये जीवितहानी झाली आहे. दरम्यान आज मुंबई नाका येथे घडलेल्या अपघातात दोन जण जखमी झाले आहे.

सिन्नर मोहदरी घाटातील घटनेत आठ विद्यार्थी एका मित्राच्या लग्नासाठी गेले होते. संगमनेरहून लग्न लावून नाशिकला परतत असताना रस्त्यात त्यांच्या कारचे टायर फुटले. त्यामुळे कार डिव्हायडर तोडून दुसऱ्या लेनमधील वाहनावर धडकली. अपघात एवढा भीषण होता जी गाड्यांचा चेंदामेंदा झाला आणि पाच जण जागीच ठार झाले तर ३ जण जखमी झाले.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!