नाशिक : विहिरीत पडलेल्या आजोबा आणि नातवाला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले (Grandfather and grandson fell into the well) आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदोरी (Chandori, Nashik) गावातील ही घटना आहे. घरा शेजारी असलेल्या विहिरीत दोघे पडले होते. धोंडीराम नाठें हे घराच्या बाजूला असलेल्या विहिरीपासून जात होते. दरम्यान त्यांचा तोल गेला आणि ते विहिरीत पडले. आजोबांना वाचवण्यासाठीच गणेश नाठे यांनी देखील विहिरीत उडी घेतली. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडत होते. विहिरीतून आवाज येत असल्याने एका इसमाने स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाला ही माहिती कळवली. स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत या दोघांचेही जीव वाचवले (Rescue of grandfathe and granson who fell into a well).
विहिरीजवळून जात असणाताना वृध्द धोंडीराम नाठे (Dhondiram Nathe) यांचा अचानक तोल गेला. परिणामी ते विहिरीत पडले. आजोबांना वाचवण्यासाठीच गणेश नाठे (Ganesh Nathe) यांनी देखील उडी घेतली. मात्र आजोबा आणि नातू दोघांनाही पोहता येत नव्हते. त्यामुळे ते पाण्यात बुडत होते. मात्र याठिकाणी जात असलेल्या एका इसमाने विहिरीतून आवाज येत असल्याचे ऐकले. तो विहिरीजवळ जाताच त्याला हे दोघे बुडत असल्याचे दिसून आले. इसमाने प्रसंगावधान राखत तात्काळ आपत्ती व्यवस्थापनाला माहिती दिली. त्यामुळे या दोघांचे प्राण बालबाल बचावले. त्यामुळे अनर्थ टळला आहे.
विहिरीत पडलेल्या आजोबा आणि नातवाचा थरारक रेस्क्यू ; पहा व्हिडिओ :
चांदोरी गावातील या घटनेत आजोबा आणि नातवाचा जीव बालबाल बचावला आहे. एक इसम जवळून जात असल्याने दोघांना रेस्क्यू करण्यात आले. आजोबा आणि नातवाचा विहिरीतून केलेला हा थरारक रेस्क्यू समोर आला आहे. आपत्ती व्यवस्थापनाने केलेल्या रेस्क्युचे हे व्हिडिओ आहे. या व्हिडिओ मध्ये ही विहीर किती धोकादायक आहे, हे देखील स्पष्ट होत आहे. विहिरीला सुरक्षिततेसाठी कठडे नाहीये. त्यामुळे पाय घसरला किंवा तोल गेला तर थेट विहिरीत पडण्याची शक्यता आहे. अगदी त्याच प्रकारे या घटनेत धोंडीराम नाठे (आजोबा) हे तोल जाऊन विहिरीत पडले. त्यामुळे विहिरीला संरक्षण कडा असणं महत्वाचे आहे, अथवा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.