युवा सेना अध्यक्ष तथा राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. अश्यातच आदित्य ठाकरे आणि सुहास कांदे यांच्यातील वाद चांगलाच पेटल्याचं दिसतेय. दोन्ही बाजूने दावे प्रतिदावे केले जात आहेत. सुहास कांदे यांनी आदित्य यांना वाघ आहे पण हा वाघ सध्या मटना ऐवजी डाळ भात खात आहे असा टोला लगावला आहे. आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. ते मनमाड येथे मेळावा घेणार होते, मात्र सुहास कांदे यांनी ठाकरेंच्या आधी मेळावा घेतला. त्यांनंतर त्यांनी आदित्य ठाकरेंना असा टोला लगावला आहे.
“आदित्य ठाकरे वाघ आहेत, पण मटण खायच्याऐवजी डाळ भात खात आहेत. उद्धवसाहेब आमदार गेले पण तुमच्या आजू बाजूचे पोट भरणारे बडवे तिथेच आहेत”, असं म्हणत सुहास कांदे यांनी आदित्य यांना टोला लगावला आहे. “आदित्य आणि उद्धव ठाकरे यांना १०० पत्र दिली. पण एकाही पत्राला त्यांनी उत्तर दिले नाही आणि म्हणूनच जिल्ह्यार्तील सर्व योजना रखडल्या गेल्या . एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि दुसऱ्या दिवशी सर्व विकासकामांना परवानगी मिळाली.
त्यांनी माझ्या काही प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. त्यांनी उत्तरे दिली तर मी तात्काळ आमदारकीचा राजीनामा देईन, असं आव्हानच शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी दिलं होते. तसेच आदित्य ठाकरे यांना भेटून जाब विचारणार असल्याचंही त्यांनी म्हटले होते. आदित्य ठाकरे यांनी ही कांदे यांच्यावर पलटवार केला आहे. मी गद्दारांना उत्तर देणार नाही. त्यांना मी बांधिल नाही. मी उत्तरं द्यावीत एवढी गद्दारांची लायकीही नाही, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी सुहास कांदे यांना फटकारले आहे
आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत, मात्र त्यांच्या हातात शिवबंधन नाही हेदेखील सुहास कांदे यांनी निदर्शनास आणून दिले. एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या आमदारांमध्ये शिवसैनिकांचं रक्त नाही. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठित खंजीर खुपसला असा आरोप केला जातोय, मात्र सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरेना प्रत्युत्तर दिले.
सोबतच कांदे यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही आरोप केले आहेत त्यामुळे राज्यातले राजकारण पुन्हा ढवळून निघत आहे. नक्षल्यांनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचे पत्र पाठवले होते. त्यावेळी इंटेलिजन्स ब्युरो, एसआयटी, सीआयडी असेल यांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्याना रिपोर्ट केले. त्यानंतरसुद्धा एकनाथ शिंदेंची सिक्युरिटी वाढवली नाही. हिंदुत्व विरोधकांना सिक्युरिटी दिली. पण हिंदुत्ववाद्यांना दिली नाही. हे का घडलं? शिंदेंना सिक्युरिटी द्यायची नाही. हिंदुत्ववाद्यांना अशी सुरक्षा का नाकारण्यात आली, असा सवाल सुहास कांदे यांनी उपस्थित केला आहे.