Home » हा विचित्र प्राणी कोणता ? नेटकरीही पेचात; व्हिडिओ भन्नाट वायरल..

हा विचित्र प्राणी कोणता ? नेटकरीही पेचात; व्हिडिओ भन्नाट वायरल..

by नाशिक तक
0 comment

सोशल मिडीयावर(Social Media) कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. अशातच सध्या समाज माध्यमांवर एका विचित्र प्राण्याचा व्हिडिओ(Viral video) पाहून नेटकरी विचारात पडले आहे. हा व्हिडिओ एका विचित्र प्राण्याचा होता. मात्र पाण्यातून डोकावून पाहणार हा प्राणी नेमका आहे तरी कोण याचा काही पत्ताच लागेना. मग काय या प्राण्याचं कुतूहल लागलेल्या नेटकरी वर्गाची हा प्राणी कोण अशी शोधाशोध सुरू झाली. त्यामुळे इतरांपेक्षा वेगळा असलेल्या या प्राण्याचा व्हिडिओ चांगलाच शेअर आणि व्हायरल झाला.

खरतर सध्या सोशल मीडियावर काहीतरी हटके व्हिडिओ टाकण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. अशात विचित्र व्हिडिओ, फोटो, फॅशन, व्यक्ती आणि प्राणी पाहणारा, त्याबद्दल जाणून घेणारा उत्साही मंडळींचा वर्ग वेगळाच. मग काय आपण कधी कल्पनाही केली नसेल असाच एक प्राणी सोशल मीडियावर चर्चेत येताच ही उत्साही मंडळी कामाला लागली आणि सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या, समुद्रात पाण्याखालून चोरून पाहणाऱ्या या माशाचा शोध लावला.

हा व्हिडीओ निरखून पाहिल्यावर लोकांना लक्षात आलं की हा प्राणी दुसरा तिसरा कोणी नसून व्हेल मासा आहे. राखाडी रंगाचा असलेला हा व्हेल मासा व्हिडिओतील महिलेच्या नजरेला नजर लावून डोकावताना दिसत आहे. हा व्हिडीओ मेक्सिकोचा असून महिला या व्हेल माश्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. ती त्याला ‘हॅलो’ म्हणते आणि व्हेल शांतपणे तिच्याकडे पाहतो. पुन्हा काही क्षणांनंतर पाण्यात निघून जातो. समुद्राच्या वाहत्या निळसर पाण्यात मात्र पाहिल्या पाहिल्या हा एक विचित्र जीव असल्याचं भासतं. कधी तो मासा नसून पाण्यातला दगड असल्याचा भास होतो. मात्र काही वेळाने लक्षात येतं की, पाण्यात राहून माश्यासारखा दिसणारा आणि डोकावून पाहणारा हा प्राणी व्हेल मासा आहे. या व्हिडिओत मात्र त्याचे मोठे डोळेच स्पष्टपणे दिसून येत आहेत.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!