घाटकोपर मध्ये राहणाऱ्या एका 67 वर्षीय आजोबांना तब्बल पावणे सात लाख रुपयांना गंडा घातल्याचा खळबळ जनक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 67 वर्षीय आजोबांना त्यांच्या व्हाट्सअप वर एक हाय चा मेसेज आला आणि आजोबा त्या सुंदरीच्या मेसेजने घायाळ झाले. त्या आजोबांना व्हिडिओ कॉल समोर नग्न होणे महागात पडले आहे. आजोबांकडून संशयित आणि तब्बल पावणे सात लाख रुपये उकळले आहेत. या घटनेला आजोबांना मानसिक धक्काच बसला आहे. घाटकोपर मध्ये राहणारे 67 वर्षीय आजोबांना 11 जुलै रोजी घरात असताना एका व्हाट्सअप क्रमांकावरून हाय असा मेसेज आला.
व्हाट्सअप वरील सुंदर चा फोटो पाहून आजोबांनी ही तत्काळ प्रतिसाद दिला काही मिनिटाच्या संवादातच समोरच्या व्यक्तीने बाथरूम मध्ये जाण्यास सांगितले बाथरूम मध्ये गेल्यानंतर त्यांना एक व्हिडिओ कॉल आला त्यामध्ये नग्न अवस्थेत असलेल्या मुलीने अश्लील संवाद करत त्यांनाही लग्न होण्यास भाग याच दरम्यान मोबाईल नीट पकडण्याबाबत सांगताच त्यांना संशयाला घाबरून मोबाईल क्रमांक डिलीट केला. त्यानंतर त्यांना दिल्ली पोलीस दलातून विक्रम राठोड नावाने कॉल आला .राठोड व्हिडिओ युट्युब वर व्हायरल होण्यापासून थांबवायचे असल्यास पंचवीस हजार रुपये पाठवण्याचे सांगून त्याचा स्क्रीन शॉट पाठवायला सांगितला त्यानंतर 32 हजार रुपये भरण्यास सांगितले त्यांनी भीतीने पैसे भरून स्क्रीनशॉट राठोड ला पाठवला यानंतर पुन्हा राठोड ने तरुणीला अटक करण्यासाठी पन्नास हजार रुपये पाठवण्यास सांगितले.
आजोबांनी तीही रक्कम पाठवली पुढे 15 जुलै रोजी तरुणीला अटक करण्यासाठी गेलो असता त्यांनी आत्महत्या केली ते सांगत आजोबांना घाबरवण्यात आले तसेच तिच्या मोबाईल मध्ये आजोबांचं गुजरातच्या व्यक्तीचा व्हिडिओ असल्याची राठोड नमूद केले मोबाईल मध्ये व्हिडिओ डिलीट करण्यासाठी पाच लाखांची मागणी केली आजोबांनी ती रक्कम पाठवली पुढे मुलीच्या कुटुंबीयांना पैसे देण्यासाठी चार लाखांची मागणी होताच आजोबांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि आजोबांनी थेट पोलीस ठाणे गाठले. घडलेला सर्व प्रकार पोलिसांना कथन केला आणि याप्रकरणी घाटकोपरच्या टिळक नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली