नाशिक: युवकाने प्रेम संबंधातून तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यापेक्षाही धक्कादायक बाब अशी की पीडितेचे नग्न अवस्थेतील फोटो संशयिताने तिच्या नातेवाईकांना व्हाट्सएप देखील केले.
प्रेम संबंधातून संशयिताने पीडित तरुणीसोबत बळजबरीने लैगिंक संबंध ठेवले व पिडीतेचे तिला न कळत नग्न अवस्थेतील फोटो देखील काढले. मात्र त्यानंतर तरुणीने लैंगिक संबंध ठेवण्यास साफ नकार दिला असता या युवकाने तिचे नग्न फोटो फेसबुकवर व्हायरल करेल अशी धमकी देत शिवीगाळ केली. सोबतच तरुणीचे सर्व नग्न फोटो तिच्या नातेवाईकांना व्हाट्सएपच्याच्या माध्यमातून या माथेफिरू युवकाने पाठवले. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी संशयित युवकाविरोधात अंबड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट २०२१ पासून ते आतापर्यंत संशयित आरोपीने पिडीतेसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडितेच्या राहत्या घरी व कॅफेमध्ये बळजबरीने तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध प्रस्थापित केले. सोबतच हे सर्व करताना तरुणीचे नग्न अवस्थेतील फोटो काढले. ते फोटो फेसबुकवर व्हायरल करेल अशी वारंवार धमकीही हा संशयित आरोपी पीडित तरुणीला देत होता. तिला शिवीगाळ ही करत होता. त्यासोबतच पुन्हा लैंगिक संबंध ठेवण्यासाठी पिडीतेवर जबरदस्ती करत होता. मात्र तरुणीने नकार देताच संशयित आरोपीने पीडितेचे सर्व नग्न फोटो तिच्या नातेवाईकांना व्हाट्सएपच्या माध्यमातून प्रसारित केले. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीनुसार संशयीता विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास अंबड पोलिसांकडून सुरू आहे.