आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर आपली ‘मंत्री’ म्हणून ओळख हटवली..

By चैतन्य गायकवाड |

मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण (Environment Minister) खात्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याबाबत एक महत्त्वाची बातमी आली आहे. महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवणाऱ्या एकनाथ शिंदेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु असतानाच आदित्य ठाकरे यांच्याबाबत मोठी बातमी आहे. शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे अधिक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. त्यांनी उद्धव ठाकरे यांना फोनवरून, मला गटनेते पदावरून का हटवले, याबाबत प्रश्न केल्याचा देखील माहिती मिळाली आहे. याच सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी त्यांच्या ट्विटर खात्यावर (Twitter account) आपली ओळख बदलली आहे. युवासेना प्रमुख (Yuvasena chief) आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आपली ‘पर्यावरण मंत्री’ म्हणून असलेली ओळख हटवलेली आहे. यामुळे राज्यात राजकीय चर्चांना उधान आलेले आहे. आदित्य ठाकरे यांनी आपली ‘मंत्री’ म्हणून ओळख हटवल्याने ते राजीनामा देणार का? हा प्रश्न आहे. तसेच सरकार अल्पमतात आल्याने मुख्यमंत्री देखील राजीनामा देणार का, हे बघणे उत्सुकतेचे असेल.

आदित्य ठाकरे यांनी ‘पर्यावरण मंत्री’ म्हणून ओळख हटवली..

शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (shivsena leader eknath shinde) यांनी पुकारलेले बंड अखेर यशस्वी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांची संख्या वाढताना दिसत आहे. जवळपास ४० आमदार आपल्याकडे असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार शेवटच्या घटका मोजत आहे. अशातच आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. ही बैठक आज अखेरची बैठक असण्याची शक्यता आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या बैठकीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार, अशी माहिती मंत्र्यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर ते आपला राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या दरम्यान आदित्य ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वाद झाल्याची देखील चर्चा आहे. तसेच एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी आदित्य ठाकरे यांना मंत्रीपदाचा उल्लेख हटवण्याचे सांगण्यात आले आहे का, ही देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.