शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी वेगळी भूमिका घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केले आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आता आमदारां नंतर खासदारही शिंदे गटात सामील झाले आहेत. एवढेच नव्हे तर नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली या अनेक महापालिकेतील अनेक नगरसेवक शिंदे गटात सामील होत आहेत अनेक पदाधिकारी देखील आपल्या पदाचा राजीनामा देऊन शिंदे गटाला समर्थन करत आहेत त्यामुळे शिवसेनेला आता मोठी गळती लागल्याचे चित्र दिसत आहे. आणि ही गळती थांबवण्यासाठी आता उद्धव ठाकरे ,संजय राऊत, यांच्याबरोबरच आदित्य ठाकरे देखील मैदानात उतरले आहेत.
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आदित्य ठाकरे हे प्रथमच नाशिक दौऱ्यावर येत आहेत आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात शिवसंवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी नाशिक मध्ये त्यांचा मेळावा होणार असून शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघात देखील आदित्य ठाकरे भेट देणार आहेत कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत. सुहास कांदे यांच्या मतदारसंघातील मनमाड येथे आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत . त्यामुळे आदित्य ठाकरे हे आता सुहास कांदे यांना आव्हान देण्यासाठी मतदारसंघात दौरा करत आहेत.
आमदार सुहास कांदे यांचे समर्थकही मोठ्या प्रमाणात आहेत. सुहास कांदे गुहाटीला असताना त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले होते . त्यामुळे आदित्य ठाकरे कांदेंच्या मतदार संघात जाऊन कार्यकर्त्यांशी सवांद साधणार असल्याने आता हे सुहास कांदे यांच्या साठी आव्हानच असणार आहे . असे असले तरी नांदगाव मतदार संघात सुहास कांदे यांना पर्यायी कोण असणार आहे ते देखील पाहन म्हत्वाच ठरणार आहे.