शिवसेनेतील (Shivsena) बंडखोर आमदारांनी भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील इनकमिंग दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढतच आहे. आमदारांपाठोपाठ आता खासदारही बंडाच्या तयारीत आहेत महाराष्ट्रातून शिंदे गटाला समर्थन देखील वाढत आहे कल्याण डोंबिवली ,ठाणे मुंबई ,नवी मुंबई ,या मोठ्या महापालिकांमधील नगरसेवक आता शिंदे घाटात सामील होत आहेत. असे असतानाच आता शिवसेना ॲक्शन मोडवर आली आहे. शिवसेनेला लागलेली गळती थांबवण्यासाठी आदित्य ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरल्याचे दिसत आहे. 21 जुलै ते 23 जुलै दरम्यान भिवंडी ,नाशिक ,दिंडोरी, संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद आणि शिर्डी या ठिकाणी ते भेट देणार आहेत.
शिवसेनेचे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी संजय राऊत यांनी नाशिक मधून सुरुवात केली होती या दरम्यान त्यांनी नाशिक मध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा पदाधिकाऱ्यांशी संवाद आणि पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर आता लगेचच आदित्य ठाकरे हे शिव संवदाच्या माध्यमातून नाशिक दौरा करणार आहेत.
शिवसेनेतील आमदारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यास धक्का उद्धव ठाकरे यांना बसल्यानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून पाय उतार व्हावे लागले आणि त्यानंतर त्यांनी शिवसैनिकांना भावनिक साथ देखील घातली होती. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी गेल्या महिनाभरात जिल्हाप्रमुखांच्या चार वेळा बैठका घेतल्या आहेत. आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेनंतर आता शिव संवाद उपक्रम राबविला जात आहे.
एकीकडे एकनाथ शिंदे शिवसेनेवर दावा करत असताना दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद उपक्रमाला आपला भगवा आपली शिवसेना असा स्लोगन देत आता संघटनात्मक पातळीवर अधिक मजबूत राहण्यासाठी ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे