शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्यानंतर आता स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ॲक्शन मोडवर आले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रा आणि शिव संवाद च्या माध्यमातून अनेक जिल्ह्यांचा दौरा करत आहेत कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत आहेत पदाधिकारी मिळावे घेत आहेत असे असताना आता शिवसेना पक्षप्रमुख स्वतः उद्धव ठाकरे हे देखील राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत त्यांनी त्या संदर्भात नियोजन सुरू केले असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना दिली आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे जवळपास महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी आपल्या दौऱ्याला एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातून सुरुवात केली आहे . आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला प्रतिसाद ही मिळत आहे आणि स्थानिक शिवसैनिक हे शिवसेनेसोबत असल्याचे देखील खा. संजय राऊत यांनी सांगितल आहे. आता आदित्य ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे देखील मैदानात उतरत आहेत . राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे ही गळती थांबवण्यासाठी आता शिवसेना ठाकरे गटाकडून प्रयत्न केले जात आहेत. याबरोबरच येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील वातावरण शिवसेना मध्ये झालेले असणार आहे असा विश्वासही खा. संजय राऊत यांनी वर्तवला आहे.