जामीन मिळल्यानंतर आव्हाडांकडून पुन्हा ‘चाणक्य’चा उल्लेख

सिनेमागृहात प्रेक्षकांना मारहाण केल्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP leader Jitendra Awad) यांना अटक करण्यात आली होती. तर आज त्यांना जामीन मिळाला आहे. उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर (granted bail) केला. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी ट्विट (Jitendra Awad Tweet) करत पुन्हा एकदा ‘चाणक्य’ चा उल्लेख केला आहे. ‘काही लोकांना जमिनीवर आणायचं असेल तर जामिनाची परवा करायची नसते. # ‘चाणक्य’ ची नीती फसली जामीन जेवण दोन्ही मिळालं. असं ट्विट केलं आहे.

काल राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं. दरम्यान आव्हाड यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा आव्हाडांनी त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. “पोलिसांवर दबाब आणण्यासाठी चाणक्याकडून शंभर फोन येत होते,” असा गंभीर आरोप आव्हाडांनी केला. तेव्हापासून हा चाणक्य कोण ? याची चर्चा सुरु आहे. अशात पुन्हा एकदा आव्हाडांनी या ‘चाणक्य’ चा उल्लेख केला आहे.

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला. ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात सुरू असलेला ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी जितेंद्र आव्हाडांना अटक केली होती. जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर होताच पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. “तुमचं आमचं नातं काय?… जय शिवाजी… जय शिवाजी…” अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या आहे. त्यांनंतर जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

“काही लोकांना जमिनीवर आणायचं असेल तर जामिनाची पर्वा करायची नसते. ‘चाणक्य’ नीती फसली. अटकेनंतर जामीन आणि जेवण दोन्ही मिळालं” (“If some people want to be brought to the ground then no need to worry about bail. # ‘Chanakya’ policy failed. Both got bail and food after arrest”) हे त्यांचं ट्वीट सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे.