नाशिक पाठोपाठ ठाकरे गटाला मनमाडमधूनही धक्का

नाशिक : एकीकडे नाशिकमध्ये ठाकरे गटाला खिंडार पडले असताना आता मनमाडमध्ये देखील ठाकरे गटाला धक्का बसला आहे. नाशिक पाठोपाठ ठाकरे गटातून मनमाडमधून माजी नगराध्यक्षा अस्मा तांबोळी, सादिक तांबोळी हे समर्थकासह शिंदे गटात सामील झाले आहते. आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितत त्यांनी शिंदे गटात केला प्रवेश केला आहे. त्यामुळे नाशिक शहरातूनच नव्हे तर जिल्हाभरातून ठाकरे गटाला धक्के पे धक्का भेटत आहे.

एकीकडे एकनाथ शिंदे गटाने नाशिकच्या ठाकरे गटाचा गड हादरवला. नाशिकमधून नगरसेवकांचा मोठा गट शिंदे गेला. शिवसेनेचे ११ माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश झाला आणि आता मनमाड मध्ये पण शिंदे गटात इन कमिंग झाल्याची माहिती हाती आली आहे. आज (दि.१६) आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थित मनमाड मध्ये माजी नगराध्यक्षा अस्मा तांबोळी, सादिक तांबोळी सह समर्थकांचा प्रवेश झाला आणि ठाकरे गटाला आणखी एक शॉक भेटला आहे.

सकाळीच महापालिकेच्या (NMC Nashik) माजी विरोधी पक्ष नेत्यासह ११ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे नाशकात ठाकरे गटाला खिंडार पडल्याच्या चर्चा होत्या. या चर्चा अजून सुरूच असताना मनमाड मधूनही ठाकरे गटाला माजी नगराध्यक्षांनी रामराम ठोकला आहे. त्यामुळे शहरातच नाही तर जिल्ह्यातही ठाकरे गटाला मोठी खिंडार पडली आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हे मोठे धक्के मानले जात आहे. काल-परवा संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असताना आज या हालचाली झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हाभरातील राजकीय घडामोडींन वेग आला आहे.

नाशकात दोन आमदार आणि एक खासदार आणि एक नगरसेवक यांशिवाय शिंदे गटाला काही हाती लागले नव्हते. नाशिकचे सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक आजी-माजी नेते उद्धव ठाकरेंसोबतच मशाल घेऊन उभे होते. मात्र ही मशाल सोडून ठाकरे गटातील सैनिकांनी ढाल तलवार हाती घेतल्याचे चित्र आहे.

नाशिकमधून वर्षा बंगल्यावर जात अजय बोरस्ते (विरोधी पक्षनेते माजी), सूर्यकांत लवटे (माजी नगरसेवक), सुवर्णा महाले, आर. डी. धोंगडे, ज्योती खोले, सुदाम डेमसे, जयश्री खर्जुल, प्रताप मेहरोलीया, सचिन भोसले, चंद्रकांत खोडे, पूनम मोगरे, राजू लवटे या सर्वांनी तःक्रे गटाला रामराम ठोकला असून शिंदे गटात प्रवेश केला तर मनमाडमधून माजी नगराध्यक्षा अस्मा तांबोळी, सादिक तांबोळी यांनी समर्थकासह शिंदे गट गाठला आहे.