पराभवानंतर भारतीय संघाला इंग्लंडच्या माजी कर्णधाराने सुनावले ‘तिखे बोल’

T20 WorldCup : टी-२० विश्वचषकातून भारतीय संघाचा पत्ता कट झाला. इंग्लंडने भारतावर १० गाडी राखून दणदणीत विजय मिळवला. भारतीय संघातून हार्दिक पांड्या आणि विराट कोहली वगळले तर इतर कोणीही चांगली कामगिरी करू शकले नाही. भारतीय संघाच्या या खराब खेळीनंतर संघावर चौफेर टीका झाली. भारतीय चाहते काय आणि इंग्लंडचा माजी कर्णधार काय कोणीच भारतीय संघावर टीका करायला कमी पडले नाही.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचा इंग्लंडकडून १० गडी राखून पराभव झाल्यानंतर टीम इंडियाला “मर्यादीत षटकांच्या क्रिकेट इतिहासातील ही सर्वात खराब टीम” अशा शब्दांत सुनावले. “इंडियन प्रीमियर लीग खेळायला जाणारा प्रत्येक खेळाडू त्याच्या खेळात किती सुधारणा झालीय ते सांगतो. पण भारताने त्यातून काय मिळवलं?” असा प्रश्न वॉन यांनी विचारला आहे. “२०११ मध्ये आपल्याच घरात त्यांनी वनडे वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर त्यांनी काय केलं? काहीच नाही. टीम इंडिया व्हाइट बॉलमध्ये अजूनही जुन्या शैलीच क्रिकेट खेळतेय. जसं क्रिकेट ते अनेक वर्षांपासून खेळत आलेत” असं मायकल वॉन यांनी आपल्या टेलिग्राममधील आपल्या लेखात म्हटलय.

भारताकडे पाच गोलंदाजांचाच पर्याय कसा असू शकतो? १०-१५ वर्षापूर्वी सर्वच फलंदाज थोडीफार गोलंदाजी करायचे. सचिन तेंडुलकर, सुरेश रैना, विरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुली यांचे दाखले वॉनने आपल्या लेखात दिले आहेत. कुठलाही फलंदाज गोलंदाजी करत नाही, म्हणून कॅप्टनकडे पाचच गोलंदाजाचा पर्याय होता, असं वॉनने म्हटलय.

यासोबतच वॉन म्हंटले’ ‘या स्पर्धेत भारत टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता. त्यानंतर या संघाने ग्रुप स्टेजमध्ये वर्चस्व गाजवत पाच पैकी चार सामने जिंकून गट १ मधील अव्वल क्रमांकावर असलेला संघ म्हणून उपांत्य फेरीत स्थान मिळवले. तथापि, अॅडलेडमध्ये सर्व भारताला इंग्लंडकडून सहज पराभूत केले गेले. २००७ च्या चॅम्पियनला सहा बाद १६८ पर्यंत नेण्यासाठी हार्दिक पंड्याने दंगल केली. प्रत्युत्तरात इंग्लंडचे सलामीवीर, जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी ८० च्या नाबाद खेळी आणि १७० धावांच्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर अवघ्या १६ षटकांत आव्हानाचा पाठलाग केला.’