नाशिकमध्ये अग्नीतांडव..! सिलेंडर ट्रकला भीषण आग

By Pranita Borse

नाशिक : जिल्ह्यातून वाहनाला आग लागल्याची तिसरी घटना समोर येत आहे. पहाटे नांदूर नाका येथे घडलेल्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या थरारक घटनेनंतर वणीच्या सप्तशृंगी गडावर प्रवाशांना घेऊन जात असलेल्या एसटी बसला आग लागली होती आणि आता पुन्हा गॅस सिलेंडर घेऊन जाणारा बुलेट ट्रक पलटी होऊन त्यात आग लागल्याची घटना घडली आहे. मनमाड जवळील पुणे -इंदौर महामार्गावर ही घटना घडली आहे. टायर फुटल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे. टायर फुटल्यामुळे मनमाड जवळील पुणे-इंदौर महामार्गावर गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. त्यानंतर ट्रकमध्ये असलेल्या गॅस सिलेंडरचा एक एक करून स्फ़ोट होण्यास सुरुवात झाली. या घटनेचे थरारक दृश्य समोर आले आहे.

आग लागल्यानंतर सिलेंडरचे एकामागून एक स्फ़ोट होत होते. त्यामुळे यामार्गावरील वाहतूक २ किमी लांब रोखून धरण्यात आली. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गॅसने भरलेले सिलेंडर असल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र सिलेंडरचे स्फ़ोट होत असल्यामुळे तेथे जाण्यास अडचण येत आहे. अपघातात चालक जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पहा व्हिडिओ

Heavy fire to cylinder truck

Community-verified icon

नाशिकमध्ये बसला आग लागणल्याची दोन्ही घटना ताज्या असतानाच आता पुन्हा एक अशीच धक्कादायक घटना समोर येत आहे. मनमाड येथे सिलेंडर घेऊन जाणारी ट्रक टायर फुटल्या आणि पलटी झाली आणि त्यानंतर जणू दिवाळीचे फटाके फुटत आहेत अशा प्रकारे एक एक करून सिलेंडर फुटण्यास सुरुवात झाली. अपघाताचा हा व्हिडिओ अंगावर काटा आणणार आहे.

नाशिकच्या औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिरची चौकात आज पहाटेच्या सुमारास बसला आग लागून झालेला अपघात ताजाच आहे. या अपघातात खाजगी प्रवासी बस जळून खाक झालीये तर या भीषण आगेमध्ये १३ प्रवाशांचा जागीच जळून मृत्यू झाला. तर ३० जण जखमी झाले आहे. पहाटी ही घटना झाल्यानंतर दुपारी पुन्हा नाशिक जिल्ह्यात वणीच्या सप्तशृंगी गडावर बसने पेट घेतला आणि आता पुन्हा गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागल्यामुळ आजचा दिवस अग्नीतांडवामुळे एक भयानक दिवस म्हणुन लक्षात राहणारा आहे.

पहाटेची घटना :

नाशिकमध्ये पहाटे झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेमुळे नाशिकच काय तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारी असल्याचं म्हटलंय. पहाटे मिरची हॉटेल जवळ झालेल्या घटनेत जवळपास ३३ प्रवासी जखमी झाले आहेत. तर १३ प्रवाशांचा जागीच जळून मृत्यू झालाय. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये दाखल झालेले असतानाच नाशिक जिल्ह्यातील पुन्हा धावत्या बसला आग लागली आणि आता ‘बर्निंग ट्रक’ चाही थरार समोर आला आहे.