Home » वायुसेनेचे लढाऊ MiG 29K विमान कोसळले..!

वायुसेनेचे लढाऊ MiG 29K विमान कोसळले..!

by नाशिक तक
0 comment

गोवा विमानतळाजवळ वायुसेनेचे मिग २९ (MIG 29) विमान कोसळलंय (An Air Force MiG 29 (MIG 29) plane crashed near Goa airport) सुदैवाने या घटनेत पायलट सुखरूप आहे. हा अपघात झाला त्यावेळी विमान गोव्याच्या किनाऱ्यावर नियमित उड्डाण करत होते. किनाऱ्यावर नियमित उड्डाण करत असताना हा अपघात झाला आहे. विमान क्रॅश झाल्यानंतर पायलट वेळेत बाहेर निघण्यात यशस्वी झाला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. अपघातापूर्वी वैमानिकाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत वेळ असता उडी मारल्याने तो बाल बाल बचावला आहे. भारतीय नौदलाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तांत्रिक बिघाडानंतर विमान तळावर परतत असताना हा अपघात झाल्याची (The accidents took place when the aircraft was returning to the base after a technical failure) माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मिग विमानाचा याआधीही झाला आहे अपघात

यापूर्वी २९ जुलै रोजी मिग-२१ क्रॅश झाले होते. भारतीय वायुसेनेचे मिग-२१ लढाऊ विमान या वर्षी २९ जुलै रोजी राजस्थानच्या बाडमेरमध्ये प्रशिक्षण उड्डाण दरम्यान क्रॅश झाले होते. या अपघातात विमानाचे दोन्ही पायलट शहीद झाले होते. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील संधोल येथील विंग कमांडर मोहित राणा (३९) आणि जम्मू येथील फ्लाइट लेफ्टनंट आदित्य बल (२६) अशी त्यांची (Mohit Rana and Aditya Bal) नावे आहेत. या अपघातानंतर पुन्हा एकदा मिग हे लडाखू विमान पुन्हा एकदा अपघातग्रस्त झाले आहे.

२००४ आणि २०१० मध्ये देण्यात आलेल्या विमानांच्या दोन ऑर्डरमध्ये भारताने रशियाकडून एकूण ४५ मिग-२९ के खरेदी केले होते. त्यानंतर २३ जून २०११ रोजी रशियन मिग-२९ के ट्रेनर क्रॅश झाले. तेव्हा दोन्ही वैमानिकांचा यात मृत्यू झाला होता. त्यामुळे भारतात विमानाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झाला. जुलै २०१६ मध्ये भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांनी आरोप केला होता की, भारताचे मिग-२९ के, २९ के फ्लीट एअरफ्रेम, RD Mk-33 इंजिन आणि फ्लाय-बाय-वायर सिस्टमशी संबंधित समस्यांनी त्रस्त होते.

मिग २९ विमानांची भारतीय लष्करात महत्त्वाची भूमिका

रशियाच्या मिकोयांग कंपनीने तयार केलेले मिग-२९ विमाने भारतीय लष्करात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. हवाई दलात त्यांची संख्या ७०च्या जवळपास आहे. हवाई दलासोबतच भारतीय नौदलही या विमानाचा वापर करत आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!