Home » सर्वसामन्यांचा खिशाला कात्री ; २०० रुपयांनी महागणार वीजबिल

सर्वसामन्यांचा खिशाला कात्री ; २०० रुपयांनी महागणार वीजबिल

by नाशिक तक
0 comment

BY-Revati Walzade

आधीच महागाईच्या काळात कसातरी उदरनिर्वाह करण्याऱ्या सर्वसामन्य लोकांची अजून एक चिंता वाढवणारी बातमी आहे. महावितरणने वीज महागणार असल्याच स्पष्ट केल आहे. प्रत्येक युनिट मागे ६० पैश्यांची वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या वीजबिलामध्ये साधारणता २००रु पर्यंतची वाढ होऊ शकते.

पेट्रोल -डीजेल, घरघुती LPG gas नंतर आता घरघुती वीजही महागणार आहे. कोळसा टंचाई हे वीजबिल महागण्या मागच मुख्य कारण आहे असं सांगण्यात आलय. कोळसाटंचाई असल्यामुळे कोळसा आयात करावी लागली आणि म्हणून वीज निर्मिती महागली आहे. बाहेरून खरेदी करावी लागणारी वीज, यासोबतच यात अजून भर म्हणून क्रॉस सबसिडीच्या रुपात मिळालेले कमी अनुदान अश्या सगळ्या कारणांमुळे वीज महागणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या सर्वसामान्याचे कंबरडे मोडणार आहे.

उन्हाळ्या मध्ये विजेची मागणी वाढलेली असताना कोल-इंडियाकडून फक्त २० टक्के कोळसा पुरवण्यात आला होता. त्यामुळं महानिर्मितीला बाहेरून कोळसा खरेदी करावा लगला होता. यामध्ये तब्बल २० हजार कोटींचा खर्च झाला व सोबतच क्रॉस सबसीडीतील पैसे देखील कोरोना काळात मिळालेला नाही. त्यात सुद्धा २० हजार कोटींचे नुकसान झालय अश्या प्रकारे एकूण ४० हजार कोटींचे मोठे नुकसान झाल्या कारणाने वीजबिल महागलंय अशी माहिती महावितरण कडून देण्यात आलीये.

वीज खरेदी खर्चातील वाढी मुळे महावितरण ने आधीच १५०० कोटी रुपये राखीव ठेवले होते. पण तो निधी २०२१ मधेच संपला असल्याची माहिती आहे. त्यामुळे महावितरणने १ एप्रिल २०२२ मध्ये खरेदीच्या वाढत्या खर्चापोटी इंधन समायोजन शुल्क आकारण्यास सुरुवात केली. या आधीच महावितरणने वीजदर १०-२० टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर आता नोव्हेंबर महिन्यात वीजदर वाढण्याची शक्यता आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!