अमेय खोपकर यांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा चर्चेत

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे या निमित्ताने त्यांच्यावर अनेक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .मात्र त्यांना येणाऱ्या शुभेच्छा या चर्चेचा विषय ठरत आहेत अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शुभेच्छांमध्ये ‘पक्षप्रमुख” असा उल्लेख टाळल्याने त्या शुभेच्छा चर्चेत आल्या त्यानंतर आता मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेल्या शुभेच्छा चर्चेत आल्या आहेत.

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर कायमच आपल्या विधानावरून चर्चेत असतात आज ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्याने चर्चेत आले आहेत खोपकर यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना “हिंदू जननायक अखंड महाराष्ट्राचे भाग्यविधाते आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची चुलत भाऊ उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा” अशाप्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत त्यामुळे आता मनसेचे नेते अमेय खोपकर यांचे हे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे .


अमेय खोपकर हे सध्या उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना टोलाही लगावला आहे.