Home » ‘त्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला’ उपमुख्यमंत्री फडणवीसांचे खळबळजनक वक्तव्य

‘त्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला’ उपमुख्यमंत्री फडणवीसांचे खळबळजनक वक्तव्य

by नाशिक तक
0 comment

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी मविआवर गंभीर आरोप केले असून या तिन्ही पक्षांनी २०१९ मध्ये मला संपवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यात ते अपयशी ठरले. अडीच वर्षात ते मला संपवू शकले नाहीत, यापुढेही संपवू शकणार नाहीत. असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिन्ही पक्षांवर गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली असून चर्चाना उधान आले आहे.


त्यांनी मला संपवायचा प्रयत्न केला पण संपवू शकले नाही,

काल झालेल्या शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी केलेल्या घणाघाती टीकांचे फडणवीसांनी प्रतिउत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरे: देवेंद्र फडणवीस यांच्या आयुष्यातली ही शेवटची निवडणूक आहे.

देवेंद्र फडणवीस: कालचे भाषण हे नैराश्यातून होते. उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले की, ही माझी शेवटची निवडणूक आहे. महाविकास आघाडीने 2019 मध्ये माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला. पण मला कोणीही संपवू शकत नाही, या पुढेही संपवू शकणार नाही.

मुंबई महापालिका निवडणुका

उद्धव ठाकरे: हिंमत असेल तर महिन्याभरात निवडणुका घ्या.

देवेंद्र फडणवीस: आम्ही कायदेशीरपणे निवडून आलो आहे. मात्र, ज्यावेळी आमच्यासोबत निवडून येऊन तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यावेळी तुम्ही राजीनामे का दिले नाहीत. त्यावेळी का निवडणुका घेतल्या नाहीत? असे थेट सवाल फडणवीसांनी विचारला आहे.

शिवसेना मोदींमुळे निवडून आली

शिवसेना मोदींचा फोटो लावून निवडून आली. तुमच्यात हिंमत होती तर त्यांनी त्यावेळी राजीनामे देऊन राष्ट्रवादी, काँग्रेससोबत निवडून यायचे होते, असे उत्तरही फडणवीसांनी दिले आहे.

निराशेचा अरण्यरुदन

उद्धव ठाकरे यांचे कालचे गटप्रमुख मेळाव्यातील भाषण म्हणजे निराशेचे अरुण्यरुदन होती, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!