अलंगुण येथील पूरग्रस्तांना सढळ हाताने मदत करण्यात आली आहे. मागील काही दिवसात सुरगाणा तालुक्यात अलंगुण येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून सुरगाणा तालुक्यातील मुस्लीम बांधवांकडून मदत करण्यात आली. यावेळी ३०,००० रोख व पुरात बाधीत कुटुंबांना किराणा साहित्याचे किट वाटप करण्यात आले. यावेळी सुरगाणा शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने जणाब मौलाना अबु शेख, अकील पठाण, इस्माईल शेख, राजु बाबा शेख,सनीबाबा राजु शेख,इजाज शेख,आझाद साडीवाला, इमरान खाटिक,सलमान खाटिक,समद शेख,मुस्ताक शेख,समीद खाटिक,मुस्ताक शहा,सत्तार बॅटरीवाले यांच्या वतीने देण्यात आले.यावेळी कॉम्रेड जे पी गावीत साहेब,कॉ भिका हरी राठोड, वसंतराव बागुल, पांडुरंग काका भोये, हिरामण दादा गावीत, अर्जुन गावीत सर,ये.तु.भोये, हेमंत भोये,मा सरपंच हेमंती भोये या सर्वांनी खुप खुप आभार मानले.