नदीत उतरून सिन्नरमध्ये गिरीश महाजन यांच्याकडून पाहणी दौरा..!

पावसामुळे सिन्नरमध्ये नुकसान झालेल्या भागाची मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली आहे. पाहणी दरम्यान नागरिकांनी महाजन यांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्या आहेत. सरस्वती नदीला पूर आल्यानंतर पुराचे पाणी बाजारपेठेत शिरलं होतं. यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झालं होतं. अशात आज सिन्नरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली आहे. गिरीश महाजन यांनी सरस्वती नदीत उतरून देखील यावेळी पाहणी केली. नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर आणि नागरिकांच्या व्यथा ऐकल्यानंतर नुकसानग्रस्तांना सोमवारी आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे आश्वासन महाजन यांनी दिलं आहे.

सिन्नरमध्ये सरस्वती नदीला पूर येऊन झालेल्या हाहाकारानंतर मंत्री गिरीश महजान आज सिन्नर दौऱ्यावर आहेत. सिन्नर मध्ये बाजारपेठेत पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी मंत्री गिरीश महाजन यांनी केली. सिन्नरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडून वित्त हानी झाली आहे. ऐन बाजारपेठेत पाणी शिरल्याने नागरिकांच्या मालाचे नुकसान झाले आहे. शिवाय या पावसात हजारो हेक्टर वराळ पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान (Crop Damage) झाले आहे. सरस्वती नदीला आलेल्या पुरामुळे अनेक घरांमध्ये आणि बाजारपेठात पाणी शिरून झालेल्या तसेच शेतीला झालेल्या नुकसानाची नुकसाभरपाई मिळावी म्हणून काल नागरिकांनी नाशिक पुणे महामार्गावर रस्तारोको आंदोलन केलं होतं.

मंत्री गिरीश महाजन यांच्या सिन्नर दौऱ्याचा Exclusive व्हिडिओ पहा

सिन्नरमध्ये हाहाकार; ढगफुटी सदृश्य पाऊस

नाशिक शहर तसेच जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. तसेच जिल्ह्यातील सिन्नरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे सरस्वती नदीला पूर आला. या पुराचे पाणी शहरातील बाजारपेठेत शिरलं होतं. परिणामी या बाजारपेठेत जवळपास २० ते ३० जण या पाण्यात अडकले होते. पाण्यात अडकलेल्या नागरिकांना रात्री उशिरापर्यंत बाहेर काढण्याचं काम सुरू होतं. स्थानिकांनी आणि प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सिन्नर आणि परिसरात काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याची देखील माहिती आहे. काल जेसीबीच्या मदतीने नागरिकांचे रेस्क्यू केले गेलं. जवळपास ३३ नागरिकांना जेसीबीवर उभे करून त्यांना पुराबाहेर काढण्यात आले.

नागरिक अडकले पुराच्या पाण्यात

सिन्नरमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने सरस्वती नदीला पूर आला. या पुराचे पाणी शहरातील मुख्य बाजारपेठेत शिरल्याने येथे जवळपास २५ ते ३० जण पुराच्या पाण्यात अडकून पडले होते. दरम्यान या नागरिकांना तात्काळ स्थानिक नागरिक व प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत युद्ध पातळीवर काम सुरू होतं.