नाशिकमध्ये (Nashik) पावसाळ्यात वाडा आणि वाड्याची भिंत कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अशात पुन्हा एकदा जुने नाशिक परिसरात वाड्याची भिंत कोसळल्याची घटना समोर आली आहे. चौक मंडई (Chauk Mandai) जवळील बुरुड गल्लीतील ही घटना आहे. दरम्यान पावसामुळे वाड्याची भिंत कोसळून दोन जण जखमी झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. याठिकाणी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं असता. अग्निशमन दलाच्या (fire brigade) जवानांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मदतकार्य केलं आहे.
नाशिकमध्ये जुन्या वाड्यांची परंपरा आजही कायम आहे. मात्र दरवर्षी पावसाळयात वाडे कोसळण्याच्या घटना समोर घडत असतात. जोरदार पावसामुळे याआधीही जुन्या नाशकात वाडे कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गेल्या चार दिवसांपूर्वीच जुन्या नाशिकमध्ये चार वाडे कोसळले होते. मात्र सुदैवानं त्या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र पुन्हा चौक मंडई जवळील बुरुड गल्लीत वाडा कोसळल्याची ही घटना घडल्याने नाशिकमधील धोकादायक वाड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नाशिकमध्ये दरवर्षी पावसाळयात वाडे कोसळण्याच्या घटना घडत असतात. आजपर्यंत पावसाळ्यात अनेकदा वाडे कोसळून यात जीवितहानीच्या देखील काही घटना दाखल आहेत. त्यामुळे नाशिकमधील हे जुने वाडे धोकादायक बनल्याचे चित्र आहे.
गेल्या काही दिवसांपासून सतत घडत आहे वाडे वाड्याच्या भिंती कोसळण्याच्या घटना
आठवड्यापूर्वी बागवानपुरा, बडी दर्गा तसेच कुंभारवाडा परिसरातील धोकादायक घर आणि वाड्यांची भिंत कोसळली होती. चार दिवसांपूर्वी दिवसभरात चार वाडे कोसळले. शहरातील आसराची वेस येथील दोन धोकादायक वाड्यांच्या भिंतीचा काही भाग कोसळण्याची घटना घडली. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास कानडे मारुती लेन येथील कपोते वाड्याच्या भिंतीचा काही भाग कोसळला. त्याच परिसरातील कानडे मारुती लेन हे मुख्य बाजारपेठ असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तसेच व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशात आज पुन्हा एकदा जुने नाशिक परिसरात वाड्याची भिंत कोसळल्याची घटना समोर आली आहे.
सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा..