नाशिकमध्ये अजून एक दुर्घटना; गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

नाशिक : जिल्ह्यात एकानंतर एक भीषण अगीतांडवाच्या घटना समोर येत आहेत. आता नाशिकमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना समोर येत आहे. नाशिकच्या नाशिकरोड परिसरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आणि यात आईसह तीन मुले भाजली गेली आहे. जिंदाल कंपनी मध्ये झालेल्या भयावह घटनेनंतर पुन्हा एक स्फोट होऊन दुर्घटना झाल्याची ही घटना आहे.

दरम्यान गॅस सिलेंडरचा हा स्फोट इतका भीषण होता की स्फोट झाल्यानंतर घरावरील पत्रे देखील उडाले आहेत. त्यावरून घटनेची भीषणता लक्षात येईल. दरम्यान जखमी झालेल्या आईसह ३ मुलांना उपारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरील काही दृश्य समोर आले असून त्यामध्ये स्फोट झाल्यानतर घराची झालेली अवस्था पाहायला मिळत आहे.

गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट..स्फोट झाल्यानंतर घरावरील पत्रे देखील उडाले..समान अस्ताव्यस्त तर घटन स्थळाचा व्हिडीओ समोर

बातमी थोडक्यात

-नाशिक मध्ये गॅस सिलेंडर चा भीषण स्फोट

-नाशिक रोड परिसरातील घटना आईसह तीन मुले भाजली

-स्फोट इतका भीषण होता की स्फोट झाल्यानंतर घरावरील पत्रे देखील उडाले

-जखमींना उपारासाठी जिल्हा रुग्णालयात करण्यात आले दाखल

गॅस सिलेंडरच्या स्फोटानंतर एका क्षणात होत्याचं नव्हत झालं. यामुळे संसाराच्या चिंधड्या उडाल्या नाशिकमधील एका कुंटुबाला हा भयानक अनुभव आला आहे. गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घर उद्धवस्त झाले आहे. घरावरची पत्रे उडाली आहे. तर प्रचंड आर्थिक नुक्सानासह आई आणि ३ मुले होरपळून निघाली आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाहीये.

नाशिकमध्ये सध्या अग्नितांडव होताना दिसत आहे. २०२३ च्या ,म्हणजेच नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी इगतपुरी तालुक्यातील जिंदाल कंपनीत भीषण स्फोट होत हाहाकार उडाला होता. ती घटना अजून ताजीच आहे. त्या घटनेत स्फोट झाल्यानंतर आतमधून जीव वाचवत…होरपळून आलेले कामगार विव्हळत असतानाचे विदारक दृश्य अजूनही समोर येत आहेत. ती घटना ताजी असताना पुन्हा ही एक घटना घडली आहे. या दुर्घटनेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या परिस्थितीबद्दलची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र स्फोटाच्या आवाजाने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण होते.