By Pavan Yeole
राज्यनाट्या नंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपचे सरकार राज्यात सत्तेवर आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० शिवसेना आमदारांनी वेगळा गट स्थापन करून राज्यात भाजप सोबत सरकार स्थापन करत महाविकास आघाडी सह शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे . त्यानंतर आता बऱ्याच ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे गटाच्या समर्थनार्थ आपापल्या पदाचा राजीनामा देत आहेत. आता शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट झाल्याचे बघायला मिळत आहेत आता यात उद्धव ठाकरे यांच्या गटाला गळती लागल्याचे चित्र दिसत आहे.आज ठाणे महानगर पालिकेतील शिवसेनेचे ६६ नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले आहे .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरातील या ६६ नगरसेवकांमध्ये ठाण्याचे महापौर नरेश मस्के यांचाही सामावेश आहे. शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केल्यामुळे या आमदारांचा वेगळा गट स्थापन झाला आणि उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला . शिवसेना शिंदे गट आणि भाजप युतीचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख यांना हा पहिला मोठा धक्का बसला असून आता ठाणे महापालिकेतील ६६ नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्याने हा ठाकरेंना दुसरा धक्का बसला आहे.या बरोबरच शिंदे गटातील आमदारांनी केलेला बंड हा शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात बंड समजला जात आहे.
ठाकरे राऊत नव्याने पक्ष बांधणीसाठी मैदानात
शिवसेनेतील ४० आमदारांच्या बंडानंतर आता शिवसेनेला गळती लागली आहे आणि हि गळती थांबवण्यासाठी आता स्वतः शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मैदानात उतरले असून, दररोज पाधिकऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत जिल्हापातळीवरील स्थानिक नेत्यांच्या ते बैठका घेत आहेत. त्यांच्या सोबतच संजय राऊत हे देखील आता पक्ष बांधणीला लागले असून त्यांनी नाशिक मधून पक्ष बळकटीसाठी नाशिक मधून सुरवात केली आहे . राज्यात सत्तापालट झाल्या नंतर संजय राऊत हे प्रथमच नाशिकला आले आहेत.
शिवसेनेतील खासदार शिंदे गटात सामील होण्याच्या चर्चेला उधाण !
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी पाहता शिवसेनेच्या आमदारानं पाठोपाठ सेनेचे खासदार देखील एकनाथ शिंदे गटात समिल होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे.शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीए च्या उमेदवार यांना सेनेच्या खासदारांनी पाठिंबा देण्याचे पत्र लहिलेल्याने आता शिवसेनेतील खासदार शिंदे गटात सामील होण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.